मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ठाण्यात अधिक लक्ष द्यायला हवं, असं का म्हणाले शरद पवार? पाहा VIDEO

ठाण्यात अधिक लक्ष द्यायला हवं, असं का म्हणाले शरद पवार? पाहा VIDEO


'ज्यांच्या हातात देशाची आणि राज्याची सत्ता आहे त्यांना ग्रामीण भागातल्या माणसांसाठी काहीतरी करावं, पण तसं काही सरकार करत नाही.

'ज्यांच्या हातात देशाची आणि राज्याची सत्ता आहे त्यांना ग्रामीण भागातल्या माणसांसाठी काहीतरी करावं, पण तसं काही सरकार करत नाही.

ठाणे महाराष्ट्रातील एक वेगळा जिल्हा आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Thane, India
  • Published by:  News18 Desk

ठाणे, 29 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. तसेच या दौऱ्याची सुरुवात ते ठाण्यातून करण्यात आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. दौऱ्यापूर्वी त्यांनी आज ठाण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाण्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे मत व्यक्त केले.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, ठाणे महाराष्ट्रातील एक वेगळा जिल्हा आहे. मी जेव्हापासून याठिकाणी आहे, विधिमंडळातील सदस्यांचे येथे जे मतदारसंघ आहेत, ते महाराष्ट्रातील 34 पेक्षा जर बघितलं तर पुण्याच्या नंतर जास्तीत जास्त विधानसभेच्या सदस्यांचे मतदारसंघ हे ठाण्यामध्ये आहेत. त्यामुळे ठाण्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असा निष्कर्ष आमच्या सर्वांचा आहे, असे शरद पवार म्हणाले.

एसी रेल्वेबाबतही मांडली भूमिका -

आज राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा आढावा बैठकीत शरद पवारांनीही महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. सामान्य लोकांचा विचार करत एसी लोकल बंद केल्या पाहिजे, अशी थेट भूमिका यावेळी त्यांनी मांडली. यासंदर्भात लवकरच ते रेल्वे मंत्र्यासोबत बैठक घेणार असल्याचं यावेळी ते म्हणाले. राज्याच्या दौऱ्याची सुरुवात ठाण्यापासून करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा - AC लोकलबाबत शरद पवारांची थेट भूमिका; लवकरच रेल्वे मंत्र्यांची घेणार भेट!

ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गड -

दरम्यान, राज्यात शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले. यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गट मानला जातो. त्यामुळे शरद पवार यांनीच आता ठाण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे मत व्यक्त केल्याने त्यांनी अप्रत्यक्षपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आव्हान दिले आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Maharashtra politics, Sharad Pawar, Thane