मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /झेडपी-पालिकांच्या निवडणुका का खोळंबल्या? रोहित पवारांनी सांगितली Inside Story

झेडपी-पालिकांच्या निवडणुका का खोळंबल्या? रोहित पवारांनी सांगितली Inside Story

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका अजूनही खोळंबल्या आहेत, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सातारा, 26 जानेवारी : महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका अजूनही खोळंबल्या आहेत, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यात केलेले सगळे सर्व्हे विरोधात गेल्यामुळे भाजप जिल्हा परिषद, पंचायत समिची आणि नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

पहिले कोरोना आणि मग ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनांचा मुद्दा मुंबई हायकोर्टात आहे. राज्यात महाविकासआघाडी सरकार असताना मुंबईतल्या प्रभागांची संख्या वाढवण्यात आली होती, यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने ही संख्या पुन्हा आधीसारखीच 227 एवढी केली. शिवसेनेने स्वत:च्या फायद्यासाठी वॉर्डची संख्या वाढवल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. वॉर्ड पुनर्रचनेचं हे प्रकरण सध्या मुंबई हायकोर्टात आहे.

First published:

Tags: BJP, NCP, Rohit pawar