मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यात का वाढत आहे कोरोना रुग्णांची संख्या? महत्त्वपूर्ण कारण आलं समोर

पुण्यात का वाढत आहे कोरोना रुग्णांची संख्या? महत्त्वपूर्ण कारण आलं समोर

शहरात सध्या 703 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 437 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

शहरात सध्या 703 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 437 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

पुण्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ का होत आहे? असा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत आता एक महत्त्वपूर्ण कारण समोर आलं आहे.

    पुणे, 26 एप्रिल : महाराष्ट्रातील महत्त्त्वाचं शहर असलेल्या पुण्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने पसरत चालला आहे. राज्यात मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. पुण्यात आणखी 49 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1233 वर पोहोचली आहे. मात्र शासन आणि प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना पुण्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ का होत आहे? असा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत आता एक महत्त्वपूर्ण कारण समोर आलं आहे. पुण्यात कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा या व्हायरसची बाधा शहरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांपर्यंत मर्यादित होती. मात्र या व्हायरसने आता झोपडपट्ट्या आणि दाटी-वाटीच्या वस्त्त्यांमध्ये प्रवेश केला आहे. अशा भागांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणं शक्य होत नसल्यानेच तिथल्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याचं दिसत आहे. याबाबत 'सकाळ'ने वृत्त दिलं आहे. पुण्यातील भवानी पेठ, येरवडा, ताडीवाला रोड, कोंढवा आणि पर्वती दर्शन या भागांतील कोरोना रुग्णांच्या सातत्याने वाढ होत आहे. गंभीर बाब म्हणजे एकाच घरातील आठ-आठ व्यक्तींना या व्हायरसची बाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. घरं छोटी असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळता येत नसल्यानेच कोरोना व्हायरस अशा भागांमध्ये आपली पकड घट्ट करत आहे. पुणे जिल्ह्यातील मृत्यूची संख्या 72 - पुणे शहरातील मृत्यू संख्या 67 - पिंपरी चिंचवड शहरातील मृत्यू संख्या 3 - काँटोमेन्ट व नगरपालिका हद्दीतील मृत्यू संख्या 2 वर.. पुणे जिल्ह्यातील कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 182 - पुणे शहरातील कोरोना मुक्त रुग्णांची संख्या 156 - पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना मुक्त रुग्णांची संख्या 21 वर.. - काँटोमेन्ट व नगरपालिका हद्दीतील कोरोना मुक्त रुग्णांची संख्या 5 वर.. आज पर्यंत पुणे जिल्ह्यातील सॅम्पल टेस्टिंग संख्या 10955 आज पर्यंत आलेल्या सॅम्पलचा रिझल्ट संख्या 10479 अ‍ॅडमिट झालेल्या नागरिकांची संख्या आजपर्यंत पुणे जिल्ह्यातील अ‍ॅडमिट झालेल्या नागरिकांची संख्या 10955 तर डीचार्ज दिलेल्या नागरिकांची संख्या 9472 इतकी आहे. क्रिटिकल रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यातील क्रिटिकल रुग्णांची संख्या 45 इतकी आहे(पुणे महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये 15 आणि ससून मध्ये 30) संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus, Pune news

    पुढील बातम्या