Home /News /maharashtra /

माणुसकी मेली का हो? ट्रक चिरडून गेल्यानंतर मृतदेह तसाच होता रस्त्यावर, VIDEO

माणुसकी मेली का हो? ट्रक चिरडून गेल्यानंतर मृतदेह तसाच होता रस्त्यावर, VIDEO

ऐन शहराच्या मध्यवर्ती भागात ही घटना घडल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    बालाजी निरफळ, प्रतिनिधी उस्मानाबाद, 03 मार्च : माणुसकी मेला का? असा प्रश्न उस्मानाबादेत घडलेल्या घटनेमुळे विचारला जात आहे. एका वृद्ध व्यक्तीला रस्त्याच्या बाजूने चालत असताना दुचाकीस्वाराचा धक्का लागला. त्यामुळे ते खाली कोसळले त्यावेळी ट्रकखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. परंतु, धक्कादायक म्हणजे, भरउन्हात त्यांचा मृतदेह हा रस्त्यावरच पडलेला होता, पण कुणीही साधा कापडही टाकयला आलं नाही. सर्वोत्तम शंकरराव अनसिंगकर असं या वृद्ध व्यक्तीचं नाव आहे. सर्वोत्तम अनसिंगकर आपल्या खाजगी कामानिमित्त उस्मानाबाद शहरातील जिजामाता उद्यान समोरील रस्त्याने पायी चालत जात होते. यावेळी त्यांना दुचाकी स्वाराचा धक्का लागला आणि ते ट्रकच्या पाठीमागचा चाकाखाली आले. ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांचा मृतदेह बराचकाळ रस्त्यावर पडलेला होता या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज असतानाही पोलिसांनी मात्र फिर्यादीच्या तक्रारीनुसार फक्त ट्रकचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर दुचाकी स्वारावर मात्र कुठलीही कारवाई केलेली नसल्याने पोलिसांच्या या अंध कारभाराची चर्चा जोरात सुरू आहे. दरम्यान, ऐन शहराच्या मध्यवर्ती भागात ही घटना घडल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मालगाडी सुरू झाली आणि आजीबाईंना असा वाचवला जीव, पाहा हा VIDEO दरम्यान, रेल्वे रूळ ओलांडू नका, त्यामुळे तुमच्या जिवाला धोका आहे, अशी सुचना वारंवार रेल्वे प्रशासनाकडून दिली जाते. पण, देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रयत्न नुकताच समोर आला आहे. एक आजीबाई रेल्वे रूळ ओलांडत असताना मालगाडी खाल्या सापडल्या पण यातून त्या अगदी सुखरूप वाचल्या. मालगाडी आजीबाईंच्या अंगावर जाणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ लोणावळ्यातील आहे असं म्हटलं जातंय. पण नेमकं कुठे घडलंय याची खात्रीशीर माहिती मिळु शकली नाही. पण झालं असं की, एका स्टेशनजवळ उभ्या असलेल्या मालगाडीच्या खालून एक आजी रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होत्या. नेमकं त्याचवेळी मालगाडी सुरू झाली मग आजी आत अडकल्या आणि खूप घाबरल्या. पण आजूबाजूला असणाऱ्या प्रवाशांनी आजीबाईंना रुळावर सरळ झोपायला सांगितलं. आणि मालगाडी जाईपर्यंत अजिबात हलू नका अशी सतत काळजीवजा सुचना करू लागले. ज्या क्षणी आजी उठतील असं वाटलं त्या क्षणी थांबा आता गाडी संपले असंही काळजीवजा तंबी लोक द्याला विसरे नाहीत. ज्या व्यक्तीनं आजींना हे समजावलं त्या व्यक्तीनं आजींचा व्हिडिओ काढायला विसरला नाही. थोडक्यात काय आजींच दैव बलवत्तर. पण सगळ्याच लोकांच असेल असं नाही. त्यामुळे उशीर झाला तरी चालेल. गुडघ्यांना थोडा त्रास झाला तरीही चालवून घ्या. पण रेल्वे पुलांचा वापर करा आणि असा जीवघेणा शॉर्टकट जर अजिबात वापरू नका.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Osmanabad

    पुढील बातम्या