महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर 90 च्या दशकातील VIDEO VIRAL, काय आहे कारण?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर 90 च्या दशकातील VIDEO VIRAL, काय आहे कारण?

सध्या महाराष्ट्रात प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हाडिओ सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.

  • Share this:

मुंबई, 26 नोव्हेंबर : कॉमेडियन जसपाल भट्टी हे 1980-90च्या दशकातील प्रसिद्ध कॉमेडियन होते. त्याच्या कॉमेडी शोचे अनेक चाहते त्यावेळी होते. ते नेहमीच देशातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर विनोदी अंदाजात टीका करताना दिसले. आपल्या कॉमेडीच्या माध्यमातून त्यांनी लोकांचे प्रश्न त्यांच्या समस्या समोर आणण्याचा प्रयत्ना केला. पण त्यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या या व्हिडीओ हा जसपाल भट्टी यांच्या कॉमेडी शो मधील एका एपिसोड भाग आहे. यामध्ये जसपाल भट्टी हे आमदार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करताना दिसत आहे. काही रकमेच्या बदल्यात ते त्या-त्या राजकीय पक्षाला आमदारांचा पुरवठा करताना दिसत आहेत. सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सध्या महाराष्ट्रातही आमदार फोडाफोडीचं राजकारण आणि राजकीय पक्ष आपले आमदार आपल्याच पक्षात कसे राहतील यासाठी जीवाचा आटापीटा ज्या पद्धतीनं करत आहेत. त्यावर हा व्हिडीओ विनोदी अंदाजात भाष्य करतो असं म्हटलं तरी चुकीच ठरणार नाही.

महाराष्ट्रातल्या सरकारचं भवितव्य आज ठरणार; या आहेत आतापर्यंतच्या घडामोडी

शनिवारी 23 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अचानक मुख्यमंत्री पदाची शपथ घेत सर्वांनाच धक्का दिला. परस्पर विरोधी विचार सारणीचे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची शक्यता असतानाच देवेंद्र फडणवीसांनी राज्यात भाजपाचं सरकार आणणं हा सर्वांसाठीच धक्का होता. यावेळी राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि महाविकासआघाडीला जोरदार धक्का बसला. त्यानंतर राज्यात लोकशाहीचा अपमान केल्याचं म्हटलं जात आहे.

शिवसेनेने भाजपवर साधले शरसंधान...'या' नेत्यांना म्हटले 'चांडाळ चौकडी'

सध्या महाराष्ट्रात प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. सत्तेसाठी बराच संघर्ष तर आहेच पण त्यासोबतच आपापले आमदार दुसऱ्या पक्षात जाऊ नये यासाठी प्रत्येक पक्षाकडून जीवाचा आटापीटा सुरू आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हाडिओ सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.

विधिमंडळ गटनेते अजित पवार नाहीतच, 'या' नेत्याच्या नावाची अधिकृत नोंद

====================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2019 09:43 AM IST

ताज्या बातम्या