मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भागवत कराडांच्या जन यात्रेची गोपीनाथ गडावरूनच सुरुवात का? पंकजा मुंडेंनी केला खुलासा

भागवत कराडांच्या जन यात्रेची गोपीनाथ गडावरूनच सुरुवात का? पंकजा मुंडेंनी केला खुलासा


'जन आशीर्वाद यात्रा संबंध देशभर आहेत. ज्या मंत्र्यांना नुकतेच केंद्रात मंत्रिपद मिळाले त्यांनी जनतेचे आशीर्वाद घ्यावेत हा...

'जन आशीर्वाद यात्रा संबंध देशभर आहेत. ज्या मंत्र्यांना नुकतेच केंद्रात मंत्रिपद मिळाले त्यांनी जनतेचे आशीर्वाद घ्यावेत हा...

'जन आशीर्वाद यात्रा संबंध देशभर आहेत. ज्या मंत्र्यांना नुकतेच केंद्रात मंत्रिपद मिळाले त्यांनी जनतेचे आशीर्वाद घ्यावेत हा...

बीड, 15 ऑगस्ट : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (pritam munde) यांना डावलून भाजपचे नेते भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रिपद बहाल करण्यात आले. त्यामुळे पंकजा मुंडे (pankaja munde ) नाराज असल्याचं समोर आलं होतं. पण, आता भागवत कराड (bhagwat karad) यांच्या जन आशीर्वाद यात्रा गोपीथनाथ गडावरून सुरू होणार आहे. अखेर या यात्रेबद्दल पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी उद्या 16 तारखेच्या गोपीनाथ गडावर होणाऱ्या यात्रेबद्दल आपली भूमिका मांडत असताना त्यांनी काढलेल्या यात्रेची आठवण व्यक्त केली. 'जन आशीर्वाद यात्रा संबंध देशभर आहेत. ज्या मंत्र्यांना नुकतेच केंद्रात मंत्रिपद मिळाले त्यांनी जनतेचे आशीर्वाद घ्यावेत हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. माझ्याकडेही आंध्रप्रदेश आणि कर्नाटकची जबाबदारी दिलेली आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. IND vs ENG : इंग्लंडच्या खेळाडूंचं बॉल टॅम्परिंग!, समोर आला धक्कादायक VIDEO भागवत कराड बीडमधून यात्रा काढणार आहे. मराठवाड्याची यात्रा परळीतून गोपीनाथ गडावरून यासाठी निघते आहे. कारण, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या या गडावर सर्व पक्षीय मोठे नेते,  साधुसंत, राजे महाराज येतात.  कारण मुंडे यांच्या विचारांना मानणार प्रत्येक जण येतो' अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली. तसंच, माझी संघर्ष यात्रा माझ्यासाठी आयुष्यातील शिकवण आहे. ती भारावलेली यात्रा आणि प्रेम करणारे लोक मला आजही आठवतात, असंही  पंकजा मुंडे यांनी सांगितलं. दरम्यान,  केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा उद्या परळीच्या गोपीनाथ गडावरुन सुरुवात होणार आहे. सकाळी 10 वाजता पंकजा मुंडे यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. विशेषतः खुद्द पंकजा मुंडे या यात्रेला हिरवा झेंडा दाखविणार असून खासदार डॉ प्रीतम मुंडे देखील उपस्थिती लावणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे. खा. प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना मंत्रिपद मिळाल्याने बीडमधील मुंडे समर्थकांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.  मात्र त्याच पार्श्वभूमीवर नाराजी दूर करण्यासाठीचा तर हा प्रयत्न नाही ना असा प्रश्न राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. मागच्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि भागवत कराड यांच्यात सर्व काही आलबेल आहे, अशी चर्चा केली जात होती. परंतु, आता स्वतः पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या यात्रेस सुरुवात होणार असल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या