मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...मग विधानसभेला बावनकुळे अकार्यक्षम होते का? खडसेंचा भाजपला सणसणीत टोला

...मग विधानसभेला बावनकुळे अकार्यक्षम होते का? खडसेंचा भाजपला सणसणीत टोला


चंद्रशेखर बावनकुळे सारख्या ओबीसी नेत्याला विधानसभा निवडणुकीच्या वेळी तिकीट देण्यात आलं नव्हतं.

चंद्रशेखर बावनकुळे सारख्या ओबीसी नेत्याला विधानसभा निवडणुकीच्या वेळी तिकीट देण्यात आलं नव्हतं.

चंद्रशेखर बावनकुळे सारख्या ओबीसी नेत्याला विधानसभा निवडणुकीच्या वेळी तिकीट देण्यात आलं नव्हतं.

  • Published by:  sachin Salve

जळगाव, 15 डिसेंबर : नागपूर विधान परिषद निवडणुकीत (Nagpur MLC election result) भाजपचे नेते चंद्रकांत बावनकुळे (chandrashekhar bawankule ) विजय झाली आहे. पण बावनकुळे सारख्या ओबीसी नेत्याला विधानसभेचे तिकीट न देण्याचे कारण काय? जर बावनकुळे कार्यक्षम असल्यामुळे त्यांना तिकीट देण्यात आल्याची विरोधक आता म्हणत आहेत तर मग त्यावेळी बावनकुळे अकार्यक्षम होते का? असा थेट सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी उपस्थित केला आहे.

विधान परिषद निवडणुकीत भाजपने सहा पैकी चार जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. पण, भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत बावनकुळे यांच्या विजयावरून भाजपला सणसणतीत टोला लगावला.

चंद्रशेखर बावनकुळे सारख्या ओबीसी नेत्याला विधानसभा निवडणुकीच्या वेळी तिकीट देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे त्यावेळी त्यांना तिकीट न देण्याचे कारण काय? जर बावनकुळे कार्यक्षम असल्यामुळे त्यांना तिकीट देण्यात आल्याची विरोधक आता म्हणत आहेत तर मग त्यावेळी बावनकुळे अकार्यक्षम होते का? असा सवाल खडसेंनी विचारला.

काय सांगता! अंतराळ अभियंते आणि न्यूरोसर्जन सामान्य लोकांपेक्षा जास्त हुशार नसतात

तसंच,  असून केवळ ओबीसी नेत्यांवर आणि आईकडून आता त्यांचे निराकरण करण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, असा टोलाही एकनाथ खडसे यांनी केला आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांची माहिती ही दिशाभूल करणारी असून जनगणना ही केंद्र सरकार करत असते. विरोधक गेल्या दीड वर्षामध्ये ओबीसी आरक्षण सोडण्याचा आग्रह धरत आहेत याबाबत त्यांची नैतिकता काय ? असा सवाल खडसे यांनी फडणवीसांना विचारत टोला लगावला.

बॉसला जाहीरपणे दिल्या शिव्या, तरीही मिळाली लाखोंची नुकसानभरपाई; वाचा सविस्तर

'2011 मध्ये झालेल्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटला असत मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात का सोडविण्यात आला नाही ? त्यावेळी  देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. परंतु, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न त्यांनी तसाच भिजत ठेवला त्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे.

First published:

Tags: Eknath khadse, एकनाथ खडसे