मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बाळासाहेबांचा थापा एकनाथ शिंदेंकडे का गेला? शिवसेनेने सांगितलं कारण

बाळासाहेबांचा थापा एकनाथ शिंदेंकडे का गेला? शिवसेनेने सांगितलं कारण

बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्यासोबत सावली सारखा मागे उभा राहणाऱ्या चंपासिंग थापा याने एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. बाळासाहेबांचा विश्वासू असलेल्या चंपासिंग थापा याने उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिवसेनेने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Shreyas

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्यासोबत सावली सारखा मागे उभा राहणाऱ्या चंपासिंग थापा याने एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. बाळासाहेबांचा विश्वासू असलेल्या चंपासिंग थापा याने उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिवसेनेने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. थापा यांना शिंदेंनी पैसे दिले असतील, त्यामुळे ते त्यांच्यासोबत गेले असतील, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

चंपासिंग थापासोबतच बाळासाहेब ठाकरे यांचे आणखी एक निकटवर्तीय मोरेश्वर राजे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. तुम्ही बाळासाहेबांचे विचार घेवून पुढे जात आहात, म्हणून थापा माझ्या सोबत आलेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

कोण आहेत चंपासिंग थापा?

उद्या सुप्रीम सुनावणी

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. आमचा सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे. जसं शिवाजी पार्कबद्दल निर्णय आला तसाच निर्णय येण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचा एकही नेते कोर्टात येत नाही, त्यांना अदृश्य शक्तींची साथ आहे, असं अरविंद सावंत म्हणाले. तसंच केंद्रीय मंत्री नारायण राणे हे बेकायदेशीरपणे काम करतात, त्यामुळे पंतप्रधान आता त्यांचा राजीनामा घेणार का? असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. किरीट सोमय्या यांनी आता राणेंचं अवैध बांधकाम तोडण्यासाठी हातात हातोडा घेऊन जावं, असा टोलाही अरविंद सावंत यांनी लगावला आहे.

First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena, Uddhav Thackeray