मुंबई, 28 मार्च : ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसला आहे. पुढची दोन वर्ष सदावर्ते यांना वकिली करता येणार नाही. राज्य बार काऊन्सिल आणि ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. मुख्य म्हणजे उच्च न्यायालयाने देखील सदावर्ते यांच्या विरोधातील शिस्तभंगाची कारवाई थांबवण्यास नकार दिला होता.
का झाली सदावर्तेंवर कारवाई?
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात वकील गुणरत्न सदावर्ते आघाडीवर होते. एसटीच्या विलिनिकरणाची मागणी त्यांनी लावून धरली होती. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सर्वाधिक काळ चाललेला.
मात्र एसटीच्या संपात सक्रीय भाग घेतल्यामुळे सदावर्तेंची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आलीय. अॅड सुशील मंचरकर यांनी यासंदर्भात बार कौन्सिलकडे तक्रार दाखल केली होती.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात वकील गुणरत्न सदावर्ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. सदावर्तेंनी कोर्टात एसटी कर्मचाऱ्यांची बाजू नेटानं मांडली तसेच त्यांनी आंदोलनात हिरारीनं सहभाग घेतला होता.
भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपातून काढता पाय घेतल्यानंतर सदावर्तेंनी संपाचं नेतृत्व केलं होतं. एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्यामुळे सर्वाधिक काळ संप रेंगाळला होता. संपातील त्या सहभागामुळेचं आता गुणरत्न सदावर्तेंवर बार कौन्सिलनं कारवाईचा बडगा उगारला आहे. अॅड सुशील मंचरकर यांनी यासंदर्भात बार कौन्सिलकडे तक्रार दाखल केली होती.त्याची दखल घेत बार कौन्सिलनं 2 वर्षांसाठी सदावर्तेंची वकिली सनद रद्द केली आहे.
सदावर्तेंना आता पुढची 2 वर्ष वकिली करता येणार नाही. बार कौन्सिलने दिलेला निर्णय सदावर्तेंना मोठा झटका मानला जातोय. गुणरत्न सदावर्ते यांनी वकिलाचा गाऊन आणि बँड परिधान करून मुंबईत विविध आंदोलनात हजेरी लावली होती. तसेच त्या ड्रेसमध्ये त्यांनी विविध प्रकारची घोषणाबाजीही केली होती. अशा कृत्यामुळे समस्त वकिलांची प्रतिमा मलिन होत असल्याची तक्रार वकील सुशील मंचरकर यांनी शिस्त पालन याचिकेत केली होती. त्यांच्या तक्रारीवर बार कौन्सिलच्या तीन सदस्यीय समितीनं निकाल देताना सदावर्ते यांची सनद दोन वर्षेांसाठी रद्द केलीय. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते यांना कोणत्याही कोर्टात वकिली करता येणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.