मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

हृदयद्रावक! वर्षभरात संपूर्ण कुटुंब संपलं; पतीच्या निधनानंतर महिलेची चिमुकल्यासह आत्महत्या

हृदयद्रावक! वर्षभरात संपूर्ण कुटुंब संपलं; पतीच्या निधनानंतर महिलेची चिमुकल्यासह आत्महत्या

अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते.

अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते.

पतीच्या निधनचा (Husband death) आघात सहन न झाल्यानं एका महिलेनं आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्यासह (Mother and son suicide) विहिरीत उडी मारून (Jump into well) आत्महत्या केली आहे.

  • Published by:  News18 Desk

नांदेड, 16 जून: पतीच्या निधनचा (Husband death) आघात सहन न झाल्यानं एका महिलेनं आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्यासह (Mother and son suicide) विहिरीत उडी मारून (Jump into well) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. एक वर्षापूर्वी पतीचं निधन झालं होतं, त्यामुळे मानसिक धक्का बसलेल्या महिलेनं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. पतीच्या निधनानंतर एक वर्षांनी देखील तिला सावरता आलं नाही, यातूनचं तिने आपल्या चार वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे.

दयावती सुभाष नरवाडे आणि अर्णव सुभाष नरवाडे अशी आत्महत्या केलेल्या मायलेकराची नावं आहेत. मृत दयावती आणि अर्णव हे बिलोली तालुक्यातील तोरणा येथील रहिवासी आहे. एक वर्षांपूर्वी दयावतीच्या यांच्या पतीचं निधन झालं होतं. पतीच्या निधनानंतर दयावती आपल्या 4 वर्षाच्या मुलाला घेऊन माहेरी हिरडगाव याठिकाणी येऊन राहिल्या. पतीचं निधन झाल्यापासून त्या नेहमी दुःखात राहात होत्या.

पतीच्या निधनानंतर एक वर्षानंतरही मृत दयावती दुःखातून सावरू शकल्या नाहीत. यातूनच त्यांनी सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास टोकाचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या चार वर्षाच्या मुलासह गंडरस यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. गावातील एका लहान मुलीनं त्यांना आत्महत्या करताना पाहिलं. यानंतर गावकऱ्यांनी सायंकाळी पाच वाजता दयावती यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

हे ही वाचा-'मी आत्महत्या करतो, माझी शूटिंग काढा' म्हणत त्याने पुलावरून घेतली उडी आणि मग...

तर बराच प्रयत्न केल्यानंतर रात्री नऊ वाजता अर्णवचा मृतदेह सापडला आहे. उमरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. एक वर्षापूर्वी पतीचं निधन झाल्यानंतर मायलेकराच्या आत्महत्येमुळे संपूर्ण कुटुंब संपलं आहे. यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Nanded, Suicide