उद्धव की राज ठाकरे ?, शरद पवारांचं उत्तर...

उद्धव की राज ठाकरे ?, शरद पवारांचं उत्तर...

आणि शेवटचा प्रश्न विचारताना राज ठाकरे म्हणाले, मीही या प्रश्नाचा आतुरतेनं वाट पाहतोय तो प्रश्न असा...

  • Share this:

21 फेब्रुवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तडाखेबंद मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरेंनी बेधडक प्रश्न विचारून धमाल उडवून दिली. मुलाखतीच्या शेवटी "तुम्हाला राज की उद्धव ?" आवडता असा प्रश्न विचारला असता शरद पवारांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं.

मुलुख मैदानी तोफ राज ठाकरे आणि राज्याच्या राजकारणातले मातब्बर नेते शरद पवार आज एकाच व्यासपीठावर आले. पुण्यात बीएमसीसी महाविद्यालयाच्या मैदानावर राज ठाकरेंनी शरद पवारांची प्रकट मुलाखत घेतली.

राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच ही शरद पवार यांची थेट मुलाखत घेतली. व्यासपीठावर राज ठाकरे शरद पवारांचा हात पकडून व्यासपीठावर आले. नरेंद्र मोदी, काँग्रेस, आरक्षण, राहुल गांधी या विषयावर राज ठाकरेंनी बेधडक प्रश्न विचारली आणि शरद पवारांनीही या प्रश्नाचं सडेतोड उत्तर दिली.

मुलाखतीच्या शेवटी राज ठाकरेंनी रॅपिड फायर राऊंड घेतला. यात त्यांनी पहिला प्रश्न विचारला तुम्हाला कोण आवडतात - यशवंतराव चव्हाण की इंदिरा गांधी? यावर पवारांनी उत्तर दिलं

दोघांचही योगदान महत्वाचं आहे.

राज ठाकरे - शेतकरी की उद्योगपती ?

शरद पवार - शेतकरी

राज ठाकरे - मराठी की अमराठी उद्योगपती?

शरद पवार - उद्योगपती

 राज ठाकरे - दिल्ली की मुंबई?

शरद पवार -दिल्ली

आणि शेवटचा प्रश्न विचारताना राज ठाकरे म्हणाले, मीही या प्रश्नाचा आतुरतेनं वाट पाहतोय तो प्रश्न असा...

उद्धव की राज ?

पवारांचं उत्तर - ठाकरे कुटुंबिय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2018 09:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading