मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मोदींचाही ग्रीन सिग्नल! शिंदे-फडणवीसांना तिसरं इंजिन कुणाचं? सस्पेन्स वाढला

मोदींचाही ग्रीन सिग्नल! शिंदे-फडणवीसांना तिसरं इंजिन कुणाचं? सस्पेन्स वाढला

मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 जानेवारी : मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राज्यातील डबल इंजिन सरकार सहा महिन्यांपासून वेगाने धावतंय. याच डबल इंजिन सरकारला आता तिसरं इंजिनही जोडू, असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं, त्यामुळे हे तिसरं इंजिन कोणत्या पक्षाचं जोडलं जाणार आहे? याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.

पंतप्रधान मोदींनीही ग्रीन सिग्नल दिल्यामुळे मनसे का राष्ट्रवादीचं घड्याळ महायुतीच्या मनगटाला बांधलं जाणार? या चर्चा राजकीय गोटात सुरू आहेत. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचं सरकार राज्यात सत्तेत आहे. केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असं डबल इंजिन सरकार मागच्या सहा महिन्यांपासून विकासाच्या वाटेवर सुसाट सुटलं आहे.

मोदींच्या मुंबईतल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डबल इंजिनच्या सरकारला तिसरं इंजिनही जोडू, असे जाहीर संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधानांसमोरच तिसऱ्या इंजिनबद्दल बोलले म्हणजे महायुतीतला तिसरा संभाव्य खेळाडू कोण? याची कल्पना मोदींना असणारच आहे.

आता हा तिसरा खेळाडू मनसे आहे का आणखी कोणी? याबाबत उत्सुकता आहे. आता इंजिनवाले राज ठाकरे बीकेसीच्या सभेला नव्हते, तसंच त्यांचा उल्लेखही त्या सभेत झाला नाही, त्यामुळे तिसरा खेळाडू धक्कातंत्राने महायुतीमध्ये सामील होणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या कार्यक्रमात पवारांचे गोडवे गायले आहेत, त्यामुळे महाविकासआघाडीमधल्या तिसऱ्या खेळाडूबाबत उत्सुकता वाढली आहे.

2014 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं, हे सगळ्यांनीच अनुभवलं आहे, त्यामुळे येत्या काळात महायुतीत एखादा आश्चर्यकारकरित्या एखादा घटकपक्ष सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, MNS, Narendra Modi, NCP, Raj Thackeray, Sharad Pawar, Shivsena