पृथ्वीराज चव्हाण खूप हुशार आहेत, या प्रश्नाचं उत्तर द्या - विनोद तावडे

भाजप प्रदेश कार्यालयात बोलताना तावडे म्हणाले की, 'पृथ्वीराज चव्हाण खूप हुशार आहेत, ते विदेशात शिकून आले आहेत. नरेंद्र मोदी जर पंतप्रधान होणार नाहीत. हा तुमचा राजकीय अभ्यास असेल तर मग कोण पंतप्रधान होणार हे त्यांनी जाहीर करावं.'

News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2019 09:52 AM IST

पृथ्वीराज चव्हाण खूप हुशार आहेत, या प्रश्नाचं उत्तर द्या - विनोद तावडे

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 02 एप्रिल : नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असं वक्तव्य करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढील पंतप्रधान कोण होणार? हे आता घोषित करावं, असं आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.

भाजप प्रदेश कार्यालयात बोलताना तावडे म्हणाले की, 'पृथ्वीराज चव्हाण खूप हुशार आहेत, ते विदेशात शिकून आले आहेत. नरेंद्र मोदी जर पंतप्रधान होणार नाहीत. हा तुमचा राजकीय अभ्यास असेल तर मग कोण पंतप्रधान होणार हे त्यांनी जाहीर करावं.' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील जाहीर सभेत शरद पवार यांच्यावर टीका करत त्यांच्या मर्मावरच घाव घातला आहे.

'पंतप्रधान मोदी यांची टीका बहुधा सुप्रिया सुळे यांना रुचली नाही. त्यामुळेच त्यांनी मोदीजी यांना कुटुंबाचा अनुभव नाही असं वक्तव्य केलं. पण नरेंद्र मोदी यांना एक भाऊ आहे. त्यांच्या भावाला मुलं आहेत. त्यांच्या भावाशी आणि त्यांच्या मुलांशी कुटुंबातील वागणूक कशी आहे. हे दिसतं. पण पवारांच्या कुटुंबातील वास्तव नरेंद्र मोदी यांनी समोर आणल्यानंतर ते स्वीकारण्यापेक्षा विनाकारण चिडचिड करू नये' असा टोलाही तावडे यांनी सुप्रिया सुळेंना मारला.

काँग्रेसनं प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्याविषयी बोलताना, तावडे म्हणाले की, 'गरीबीवर वार, मिळणार ७२ हजार' ही घोषणा म्हणजे काँग्रेसला 'गरीबांवर वार वडेरा मालदार' अशी करायची आहे. तसंच हम निभायेंगे या काँग्रेस जाहीरनाम्याच्या घोष वाक्यावर बोलताना तावडे म्हणाले की, हम निभायेंगेच्या 'हम'मध्ये कोण आहेत. ममता, मायावती आहेत, अखिलेश आहे, आंध्रचे चंद्रबाबू आहेत, केरळचे नेते आहेत, तामिळनाडूचे नेते आहेत. जे काही २५ जण रांगेत उभे आहेत, त्या 'हम' मधला नेमका कोण आहे. हे स्पष्ट करावे नाहीतर हम आपके है कौन असे म्हणावे लागेल. त्यामुळे काँग्रेसच्या जाहिरनाम्यातील हम निभायेंगे या घोष वाक्यातील हम म्हणजे नेमके कोण हे काँग्रेसने सांगण्याची गरज आहे आणि जर काँग्रेसने हे सांगितलं तरच या जाहिरनाम्याला अर्थ राहील', असे तावडे म्हणाले.

Loading...

काँग्रेसला अखेर पुण्यामध्ये उमेदवार मिळाला, त्याबद्दल तावडेंनी केलं अभिनंदन

'मोहन जोशींसारख्या काँग्रेस कार्यकर्त्यालाच तिकीट द्यायचे होतं तर इतके दिवस काँग्रेस राष्ट्रवादीच्या दबावाखाली प्रवीण गायकवाडांचा प्रवेश करून का थांबली होती. याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजं. पण शेवटी काँग्रेसला उमेदवार मिळाला, ही लोकशाहीसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे.'


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2019 09:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...