Home /News /maharashtra /

कुणाला आमदार म्हणावं, हेच कळत नाही? इंदोरीकर महाराजांची एकनाथ शिंदेंच्या बंडावर तुफान फटकेबाजी, VIDEO

कुणाला आमदार म्हणावं, हेच कळत नाही? इंदोरीकर महाराजांची एकनाथ शिंदेंच्या बंडावर तुफान फटकेबाजी, VIDEO

कुणाला आमदार म्हणावे हेच कळत नाही, जनतेचा भरडा झाला आहे. दोन दिवस झाली तुकोबांच्या पालखीची बातमी दिसत नाही.

कुणाला आमदार म्हणावे हेच कळत नाही, जनतेचा भरडा झाला आहे. दोन दिवस झाली तुकोबांच्या पालखीची बातमी दिसत नाही.

कुणाला आमदार म्हणावे हेच कळत नाही, जनतेचा भरडा झाला आहे. दोन दिवस झाली तुकोबांच्या पालखीची बातमी दिसत नाही.

    नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, २५ जून : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. मागील पाच दिवसांपासून हा राजकीय संघर्ष सुरू आहे. लोकप्रिय किर्तनकार इंदोरीकर महाराज (indurikar maharaj kirtan) यांनी आपल्या खास शैलीत किर्तनाच्या माध्यमातून परखड भाष्य केलं आहे. चाळीसगावमध्ये भाजपचे खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदोरीकर महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी इंदोरीकर महाराज यांनी राजकीय घडामोडीवर जोरदार बॅटिंग केली. 'आज जे चाललंय ते पंचांगने सांगितले होते. कालचं आणि आजचं जे सांगितलं होतं ते पंचागामध्ये सांगितलं होतं. कुणाला आमदार म्हणावे हेच कळत नाही, जनतेचा भरडा झाला आहे. दोन दिवस झाली तुकोबांच्या पालखीची बातमी दिसत नाही. माऊलींची पालखी पुण्यातून निघाली बातमी दिसत नाही. पाऊस पडला आहे, शेतकऱ्यांना बियाणं भेटत नाही, तो हवालदिल झाला आहे. पण, कुणालाच काही फरक पडत नाही.कुणीही दखल घेत नाही. सध्याची फक्त एकच ब्रेकिंग न्यूज 'मीटिंग सुरू', आताची महत्त्वाची बातमी आहे. खलबत.... लोकच बधीर झाले आहेत, तुम्हाला झालं काय नेमकं? असा सवाल इंदोरीकर महाराजांनी उपस्थितीत केला. फक्त लोभ नावासाठी अख्खी मंडळी १५ दिवस एकत्र आली. खुर्चीच्या लोभासाठी विरोधकही एकत्र आले, सगळे एकत्र आहे. कुणीही काही बोलायला तयार नाही. आपल्या गावातलं कुणी नाही नाहीतर गेलो असतो लग्नाला. ते कसे रंगले आहे आता, मस्त निवडणुका काढल्या. शिका त्यांच्याकडून आता कुणी म्हणेल का हे विरोधक आहे का? तुम्ही आता नुसते दात कोरत बसा, तुमची तर किंमत संपली. तुम्हाला विचारलं का कुणी, असं काही करतो म्हणून. तुम्ही फक्त त्यांचे बोर्ड लावा, सतरंज्या झटका आणि मरा, तुम्हाला अशी लाज वगैरे नाही का? असं म्हणत इंदोरीकर महाराज यांनी कार्यकर्त्यांचेही कान उपटले. 'तीन दिवस झाले कुणालाच सुधरत नाही बटन दाबले की ऐकू येत ब्रेकिंग न्यूज, बैठक सुरू तुम्ही असेच मरणार' असं देखील वक्तव्य कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी कीर्तनातून केले. तसंच, 'शिकून काय करणार ज्यांच्याकडे तालुके आहे त्यांना शिकवावं लागतं मतदान कसं करायचं. त्यांची तीन वेळा बैठक घ्यावी लागते. 'झाकली मूठ सव्वा लाखाची आंधळे दळत आणि कुत्रं पीठ खातं' असा टोलाही इंदोरीकर महाराज यांनी आमदारांना लगावला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या