खेड, 19 मार्च : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडच्या गोळीबार मैदानात जाहीर सभा घेतली. शिवसेनेच्या या कार्यक्रमात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. 'गुलाबराव पाटील यांच्यासह 20 आमदार तुमच्याकडे आले होते, काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, सुरतला गेलेल्या 16 जणांना घेऊन येतो ते म्हणाले, पण त्यांनाच उद्धव ठाकरेंनी गेट आऊट केलं. आता खोके बोलायला तुम्हाला लाज वाटत नाही?', अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.
'मिठाईचे खोके मीपण दिलेत आणि ही माणसं खोके म्हणतायत, लाज वाटत नाही. आज काही बोलत नाहीत, पुष्कळ गोष्टी आमच्याकडे आहेत. कुणाची हॉटेल श्रीलंकेला आहेत, कुणाची हॉटेल सिंगापूरला आहेत. कुणाचे हॉटेल लंडनला आहेत. अमेरिकेमध्ये कोणाच्या प्रॉपर्ट्या आहेत. एक दिवस महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणल्याशिवाय रामदास कदम स्वस्थ बसणार नाही', असा इशारा रामदास कदम यांनी दिला आहे.
'सगळे दरवाजे उघडे ठेवा, शेवटी फक्त...', शिंदेंचं ठाकरेंना चॅलेंज!
'खोक्यांची भाषा तुमच्या तोंडात, शोभतं तुम्हाला हे? रामदास कदमने मराठवाड्यामध्ये खोकेच्या खोके वाटून तुमची उंची वाढवली', असा आरोपही कदम यांनी केला.
मुख्यमंत्र्यांचाही इशारा
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, खोके म्हणता. माझ्याकडे बरंच काही आहे, पण मी ते बोलू इच्छित नाही, पण याचा अर्थ मला काही माहिती नाही, असं नाही. पण सहन करण्याची मर्यादा असते, मर्यादा संपण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
अजितदादांचा डोळा ते पवारांचा बल्ब, एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना सांगितला पुढचा धोका!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Ramdas kadam, Shivsena, Uddhav Thackeray