बीड, 16 ऑगस्ट : 'प्रतिमा आणि प्रतिष्ठा आणि त्या पदाला ती मिळवण्याची लायकी कुणाकडे असते आणि कुणाकडे नसते', असं म्हणत भाजपच्या नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) आणि राष्ट्रवादीचे (ncp) मंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांचं नाव न घेता सणसणीत टोला लगावला.
बीडमधील भाजप समर्थ बूथ अभियानाच्या कार्यक्रम पंकजा मुंडे यांच्या उपस्थिती आज पार पडला. यावेळी पंकजा मुंडे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षण आणि बीड जिल्ह्याच्या मुद्यावरून चौफेर तोफ डागली.
'जिल्हा नियोजन बैठकीत अभियंता का येत नाही, तुम्ही अभियंत्याला विकले गेले, तुम्ही अधिकारी आणता, माझ्या वेळी अवैध धंदे होत होते का? 1/ 2 टक्के होत असेल आता तर माझ्या मतदारसंघांमध्ये एवढे नंबर 2 चे धंदे झालेत, पाहिजे तेवढ्या हातभट्ट्या लावा पाहिजे तेवढी दारूचे दुकान टाका, मटके तर उघडून ठेवले, जुगार वाढला आहे, जिल्ह्यामध्ये कशाला लोक पोलिसांना घाबरतील, कशाला मोठे अधिकारी पालकमंत्र्याला घाबरतील. कारण, प्रतिमा आणि प्रतिष्ठा आणि त्या पदाला ती मिळविण्याची लायकी कुणाकडे असते आणि कुणाकडे नसते, असं म्हणत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचं नाव न घेता टोला लगावला.
बापरे! 'या' देशात Corona च्या पाचव्या लाटेमुळे हाहाकार; दररोज 600 जणांचा मृत्यू
तसंच, 'माझ्या दुसऱ्या पक्षांमध्ये फार चांगले संबंध आहेत मला वाटतंच नाही की मुख्यमंत्री बदलले आहेत. वाटतच नाही मला कळलं का, माझे पक्षाविषयी माझे समर्पन आहे, माझ्या मनात पक्षाविषयी सन्मान आहे. तसंच माझे दुसऱ्या पक्षात खूप चांगले संबंध आहेत गोपीनाथ गडावर भागवत कराड आले म्हणून मला विचारलं, तेव्हा मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे येऊन गेले, छगन भुजबळ मंत्री झाल्यावर आले होते, दोन्ही छत्रपती येऊन गेले अमित शहा येऊन गेले भय्यू महाराज, नामदेव शास्त्री महाराज येऊन गेले. सगळं घेऊन गेले गोपीनाथ गड ही लोकनेते मुंडे साहेबांची समाधीस्थळ आहे' असंही पंकजा म्हणाल्यात.
...तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही, पंकजा मुंडेंची घोषणा
'बीडमध्ये एक सुंदर उदाहरण घालून देऊ आरक्षण लढा वेगळ्या मार्गाने उभा करूया. 'जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत गळ्यात हार घालणार नाही. ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत मला कुणी फेटा बांधायचा नाही,' अशी घोषणाही मुंडेंनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.