कोरोना घातक रुप धारण करत असताना महाराष्ट्राला दिलासा देणारी आकडेवारी

कोरोना घातक रुप धारण करत असताना महाराष्ट्राला दिलासा देणारी आकडेवारी

राज्यासह देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना महाराष्ट्राला दिलासा देणारी एक आकडेवारी समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 5 मे : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात सोमवारी नव्याने ७७१ रुग्णांचे निदान झाले आहे. आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे तसेच मनपा यांच्याकडील आकडेवारी ही आय सी एम आर वेबपोर्टल यादीनुसार अद्ययावत करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. राज्यात सोमवारी ३५० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २४६५ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. त्यामुळे एकीकडे बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.

आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ७६ हजार ३२३ नमुन्यांपैकी १ लाख ६२ हजार ३४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर १४ हजार ५४१जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९८ हजार ४२ लोक होम क्वारन्टाइनमध्ये असून १३ हजार ६ लोक संस्थात्मक क्वारन्टाइनमध्ये आहेत.

काल (सोमवारी) राज्यात ३५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील १८, पुण्यातील ७ , अकोला मनपातील ५, सोलापूर जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, ठाणे शहरात १आणि नांदेड शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू मुंबईत झाला आहे. काल झालेल्या मृत्यूंपैकी २२ पुरुष तर १३ महिला आहेत. ३५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर १९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या पैकी दोघांच्या इतर आजारांबद्दलची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३३ रुग्णांपैकी २३ जणांमध्ये ( ७० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग,

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ९३१० (३६१)

ठाणे: ६४ (२)

ठाणे मनपा: ५१४ (८)

नवी मुंबई मनपा: २५४ (४)

कल्याण डोंबिवली मनपा: २२८ (३)

उल्हासनगर मनपा: ४

भिवंडी निजामपूर मनपा: २२ (२)

मीरा भाईंदर मनपा: १५२ (२)

पालघर: ४६ (१)

वसई विरार मनपा: १५८ (४)

रायगड: ४१ (१)

पनवेल मनपा: ६४ (२)

ठाणे मंडळ एकूण: १०,८५७ (३९०)

नाशिक: २१

नाशिक मनपा: ३१

मालेगाव मनपा: ३३० (१२)

अहमदनगर: ३५ (२)

अहमदनगर मनपा: ०७

धुळे: ८ (२)

धुळे मनपा: २४ (१)

जळगाव: ४६ (११)

जळगाव मनपा: ११ (१)

नंदूरबार: १८ (१)

नाशिक मंडळ एकूण: ५३१ (३०)

पुणे: १०२ (४)

पुणे मनपा: १७९६ (१०६)

पिंपरी चिंचवड मनपा: १२० (३)

सोलापूर: ३ (१)

सोलापूर मनपा: १२६ (६)

सातारा: ७९ (२)

पुणे मंडळ एकूण: २२२६ (१२२)

कोल्हापूर: ८

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: ३२

सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)

सिंधुदुर्ग: २ (१)

रत्नागिरी: १० (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ६० (३)

औरंगाबाद:३

औरंगाबाद मनपा: ३१० (१०)

जालना: ८

हिंगोली: ५२

परभणी: १ (१)

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ३७५ (११)

लातूर: १९ (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ३

नांदेड मनपा: २८ (२)

लातूर मंडळ एकूण: ५४ (३)

अकोला: ७ (१)

अकोला मनपा: ४८ (५)

अमरावती: १ (१)

अमरावती मनपा: ५७ (९)

यवतमाळ: ९१

बुलढाणा: २४ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: २२९ (१७)

नागपूर: २

नागपूर मनपा: १७२ (२)

वर्धा: ०

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: १

चंद्रपूर मनपा: ३

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: १८० (२)

इतर राज्ये: २९ (५)

एकूण: १४ हजार ५४१ (५८३)

(टीप – ही माहिती केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, कोव्हिड१९ पोर्टलवरील प्रयोगशाळांनी दिलेल्या कोव्हिड १९ बाधित रुग्णांच्या माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे.सदरील अहवाल आय सी एम आर टेस्ट आय डी ११३९५४पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई मनपा आणि ठाणे , रायगड, व पालघर हे जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांबाबत आय सी एम आर प्रयोगशाळेच्या एकूण आकडेवारीत वाढ झालेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या अहवालात बदल होऊ शकतो. )

दरम्यान, सोमवारी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री यांनी पुणे संचालक आरोग्य सेवा कार्यालयातील कोरोना वॉर रुमला भेट दिली. राज्य पातळीवर कोरोना नियंत्रणाचे काम कशाप्रकारे सुरु आहे, याची माहिती घेतली.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 5, 2020, 8:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading