मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

"भाजपसोबत सत्तेत असताना गुलामासारखी वागणूक, शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न झाले" : संजय राऊत

"भाजपसोबत सत्तेत असताना गुलामासारखी वागणूक, शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न झाले" : संजय राऊत

Sanjay Raut on BJP: शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठ वक्तव्य केलं आहे. शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न झाल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

जळगाव, 12 जून: भारतीय जनता पक्ष (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात मतभेद झाल्यानंतर दोन्ही पक्षांची युती (Yuti) तुटली. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP)सोबत मिळून राज्यात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिवसेना आणि भाजप यांच्यात तणावाचे वातावरण असून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्याच दरम्यान आता शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

जळगाव दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना म्हटलं, "राजकारणात काहीही घडू शकतं, राजकारण फार चंचल असतं, कधी काय होईल सांगू शकत नाही. शिवसेनेचं भाग्य आहे. गेल्या पाच वर्षात सत्तेत असून सुद्धा शिवसेना संपवण्याचे प्रयत्न झाले. की आपण जणू गुलामच होतो. दुय्यम स्थान दिलं जात होतं. आपली अवस्था खूप वाईट होती. मला सदैव असं वाटायचं की या राज्याला मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असावा."

"सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाशिवाय देशात कोणतीही प्रमुख आघाडी होणं अशक्य" : संजय राऊत

संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया देताना म्हटलं, "मला वाटतं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना अत्यंत सन्मानाने उद्धवजी असतील आणि इतर असतील यांना वागणूक दिली असं शिवसेनेतील मंत्री सांगतील. परंतू आज मुख्यमंत्री शिवसेनेचा असतानाही ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या मागे फरफट होतेय याला राऊत साहेब नेमकं काय म्हणणार आहेत याचं उत्तरही त्यांनी द्यावं".

हा शिवसेनेच्या विचाराचा अवमान आहे. शिवसैनिक किंवा शिवसेनेचा कोणताही नेता अशा प्रकारे गुलाम होईल यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना प्रत्येक मंत्र्याला अतिशय प्रेमाची, सन्मानाची वागणूक द्यायचे अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

First published:

Tags: BJP, Sanjay raut, Shiv sena