मुंबई, पुण्यात कोरोना वाढत असताना राज्यात एका गावानं कोरोनाला रोखलं, नेमकी काय केली उपाययोजना?

मुंबई, पुण्यात कोरोना वाढत असताना राज्यात एका गावानं कोरोनाला रोखलं, नेमकी काय केली उपाययोजना?

मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोना झपाट्याने वाढत असताना या गावात मात्र कोरोनावर नियंत्रण आणण्यास यश आलं आहे

  • Share this:

सांगली, 9 एप्रिल : इस्लामपूर हे सांगली (Sangali) जिल्ह्यातील एक लहानस शहर आहे. हे शहर मुंबई-बंगळुरू महामार्गावर येतं. येथील लोकसंख्या सुमारे 70 हजार आहे. साधारण 23 मार्च रोजी एका शहरातील कुटूंबातील 4 सदस्यांना कोरोनाची लागण झाली. यानंतर जिल्हा प्रशासनाने येथे वेळ न गमावता कोरोना (Covid - 19) चा लढा आणि त्याचा बचाव करण्यासाठी प्रयत्न तीव्र केले. नियंत्रणासाठी त्याने कंटेनमेंट झोन म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र तयार केले.

या सर्व संसाधनांचा उपयोग कोरोना व्हायरसविरुद्ध (Coronavirus) लढण्यासाठी वापरली जात होती. परिणामी 17 दिवसांत कोरोना (Covid -19) संसर्ग होण्याचे प्रमाण 4 वरून केवळ 26 पर्यंत वाढले आहे. विशेष बाब म्हणजे  बुधवारपर्यंत यातील 9 रुग्णही बरे झाले आहेत. इतर शहरांची वाढती संख्या पाहता इस्लामापूरमधील हे उदाहरण आश्वासक आहे.

जिल्हा प्रशासनाकडून त्वरित कारवाई

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार इस्लामपूरमध्ये कोरोना संसर्ग झालेले सर्व लोक एकाच कुटुंबातील 4 संक्रमित लोकांच्या संपर्कात आले होते. गावात पहिला कोरोना रुग्ण समोर येताच सांगली जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई केली. या कारवाईसाठी प्रशासनाने जिल्हा रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार केली.

या टीमचे काम इस्लामपूरमधील 4 कोरोना पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आलेल्यांची ओळख पटवून त्यांना क्वारंटाइन करण्याचे होते. या  कुटुंबाच्या घरापासून एक किमी अंतराचा परिसर हा हॉटस्पॉट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त आणखी 1 किमी त्रिज्याचा बफर झोन निश्चित केला गेला. यामध्ये जाण्याचा आणि येण्याचा एकच मार्ग बनविण्यात आला होता. या झोनमध्ये 1,608 कुटुंबे आणि 7600 लोक राहत आहेत.

प्रशासन रात्रभर कामात व्यस्त

सांगली जिल्हा दंडाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाने 53 हाय रिस्क आणि 426 कमी कमी रिस्क असलेल्या लोकांचा शोध घेतला. ज्यामध्ये नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्यांची तपासणी करण्यात आली व त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. यामध्येही संशयितांना अलग ठेवण्यात आले. इस्लामपूर बाजाराचा परिसर बॅरीकेड टाकून रात्रीत बंद करण्यात आला. त्याच रात्री संपूर्ण परिसर बंद करून स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आलं.

रेशनची व्यवस्था केली

संसर्ग झालेल्या कुटुंबाच्या घराजवळ राहणारा विद्यार्थी सौरभ म्हणाला की, पहिले दोन दिवस लोकांना त्रास सहन करावा लागला. परंतु नंतर प्रशासनाने रेशन, दूध आणि भाजीपाला पुरवठा सुरळीत केला. लोकांना सांगण्यात आले की जर कोणाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

कुटुंबातील 1 सदस्याला बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली. कंटेनमेंट झोनमधून येणारे प्रत्येक वाहनाचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं. बफर झोनमधील एका कुटुंबातील केवळ एका सदस्याला आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर येण्याची परवानगी होती. या काळात लोकांना माहितीपूर्ण पुस्तके वाटण्यात आली.

संबंधित - कोरोनापासून कसा कराल बचाव? वुहानमधील भारतीयाने दिला महत्त्वपूर्ण सल्ला

डॉक्टर वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू, तीन मुलांनी व्हिडिओ कॉलवरून घेतलं अंत्यदर्शन

 

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: April 9, 2020, 10:06 PM IST

ताज्या बातम्या