मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पतंग उडवताना 10 वर्षांचा मुलगा इमारतीवरून खाली कोसळला, लोखंडी सळई घुसली पोटात आरपार!

पतंग उडवताना 10 वर्षांचा मुलगा इमारतीवरून खाली कोसळला, लोखंडी सळई घुसली पोटात आरपार!

बुलडाण्यात (buldhana) इमारतीवरून पंतग उडवणे एका 10 वर्षांच्या मुलाच्या अंगलट आले आहे.

बुलडाण्यात (buldhana) इमारतीवरून पंतग उडवणे एका 10 वर्षांच्या मुलाच्या अंगलट आले आहे.

बुलडाण्यात (buldhana) इमारतीवरून पंतग उडवणे एका 10 वर्षांच्या मुलाच्या अंगलट आले आहे.

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलडाणा, 25 डिसेंबर : पतंग (kite) उडवताना नेहमी काळजी घ्या असं वारंवार सांगितलं जातं, पण पतंग उडवण्याच्या नादामध्ये अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. बुलडाण्यात (buldhana) इमारतीवरून पंतग उडवणे एका 10 वर्षांच्या मुलाच्या अंगलट आले आहे. इमारतीवरून हा मुलगा खाली कोसळला, या मुलाच्या पोटातच सळई घुसली आहे. या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रावनटेकडी परिसरातील ही घटना आहे. रुद्र लुलेकर असं या 10 वर्षीय मुलाचे नाव आहे. आज सकाळी रुद्र पतंग उडवण्यासाठी घराच्या गच्चीवर गेला होता. पतंग उडवत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि इमारतीवरून खाली कोसळला.

नाशिक: बैलगाडा शर्यतीत बैल जोडी उधळली, बैलांची शिंग दुचाकीत अडकली

धक्कादायक म्हणजे, इमारतीवरून खाली पडल्यानंतर उभ्या असलेल्या लोखंडी सळईवर हा पडला. त्यामुळे त्याच्या पोटात सळई आरपार घुसली. रुद्र खाली पडल्याचं कळताच कुटुंबीयांनी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोटात सळई आरपार घुसल्यामुळे त्याला बाहेर काढता येत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांना तिथे बोलावण्यात आले लोखंडी सळई कापण्यात आली. त्यानंतर रुद्रला तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. तिथे प्रथमोपचार करून त्याला अकोला येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आलं आहे.

या संपूर्ण घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. आपली मुलं नेमकी काय करत आहे? याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.

नशेबाजीसाठी बुलडाण्यात तरुणांचा धक्कादायक प्रकार

दरम्यान, अवैधरित्या शरीरयष्ठी वाढवण्यासाठी आणि नशा करण्यासाठी बुलडाण्यातील एका तरुणानं 'टर्मिन' नावाचं इंजेक्शन डॉक्टरांच्या परस्पर विकत (buy termin injection) घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे टर्मिन इंजेक्शन प्रतिबंधित असून काही महत्त्वाच्या आजारांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली याचा वापर केला जाऊ शकतो. असं असताना बुलडाण्यातील एका तरुणाने एमडी झालेल्या डॉक्टरांच्या लेटरपॅडचा वापर (misuse of MD doctor's letter pad) करून हे इंजेक्शन खरेदी केलं आहे. हा प्रकार उघडकीस येताच डॉक्टरही हैराण झाले आहे.

IND vs PAK : 4,4,4,4,4,6, तुळजापूरच्या राजवर्धनने पाकिस्तानला धुतलं!

या प्रकरणी संबंधित महिला डॉक्टरने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. डॉ. शितल भावेश चव्हाण असं फिर्यादी महिला डॉक्टरचं नाव आहे. त्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नांदुरा रोडवरील चव्हाण हॉस्पिटलच्या संचालिका आहेत. आरोपी तरुणानं चव्हाण डॉक्टरांच्या बनावट लेटरहेडचा वापर करत प्रतिबंधित असलेलं 'टर्मिन' इंजेक्शन मेडिकलमधून विकत घेतलं आहे. हा सर्व प्रकार मेडिकलमधील cctv कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी महिला डॉक्टरने संबंधित युवकाविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.

First published:
top videos