Home /News /maharashtra /

कोणत्या कंपन्या सुरू राहणार आणि उद्योजकांना सरकारने नेमक्या काय सूचना दिल्या? जाणून घ्या

कोणत्या कंपन्या सुरू राहणार आणि उद्योजकांना सरकारने नेमक्या काय सूचना दिल्या? जाणून घ्या

कठोर निर्बंधांची घोषणा (Lockdown in Maharashtra) केल्यानंतर आज रात्री 8 वाजेपासून राज्यभर कलम 144 लागू होणार आहे.

    मुंबई, 14 एप्रिल: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कठोर निर्बंधांची घोषणा (Lockdown in Maharashtra) केल्यानंतर आज रात्री 8 वाजेपासून राज्यभर कलम 144 लागू होणार आहे. बुधवार 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून दि 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणं, उपक्रम, सेवा बंद राहणार आहेत. मात्र जीवनावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या सेवा आणि व्यवहार हे यातून वगळण्यात आले आहेत. नव्या आदेशानुसार काय सुरू राहील व काय बंद असेल, कुठल्या सेवा, आस्थापना सुरू असतील, कुठल्या बाबींसाठी सूट असेल आदींबाबतची माहिती जारी करण्यात आलेल्या नियमावलीत देण्यात आली आहे. कोणती कार्यालये अपवादात्मक श्रेणीमध्ये असतील: केंद्रीय, राज्य तथा स्थानिक शासकीय कार्यालय, त्यांचे प्राधिकरण आणि संघटन सहकारी, सार्वजनिक युनिट आणि खाजगी बँक, आवश्यक सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे कार्यालय, विमा मेडिक्लेम कंपन्या, उत्पादन /वितरण व्यवस्थेमध्ये असणारे औषधी कंपन्यांचे कार्यालय, सर्व गैर-बँकिंग वित्तीय महामंडळ, सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था, जर प्राधिकरण आयोगांच्या सुनावणी चालू असेल तर त्या वकिलांचे कार्यालय....या सर्वांनी कमीत कमी कर्मचाऱ्यांसोबत काम करावे आणि एका वेळेला कार्यालयात क्षमतेच्या 50 टक्क्यापेक्षा जास्त कर्मचारी कोणत्याही स्थितीत हजर राहता कामा नये. फक्त कोविड-19 च्या कामासाठी असणारे शासकीय कार्यालय अपवाद असतील. सदर कार्यालयांमध्ये हजर राहण्यासाठी येण्या-जाण्यासाठी परवानगी गृहीत धरण्यात येईल. सरकारने कंपन्यांना कोणते आदेश दिले? आवश्यक असल्यास, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन याच्यामध्ये आणखीन काही अपवाद जोडू शकतात. अभ्यागतांना कार्यालय मध्ये बोलवता कामा नये. कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणाशीही बैठक घ्यायची असल्यास ऑनलाइन साधनांचा वापर करावा. भारत सरकारच्या नियमानुसार सरकारी व खाजगी,अशा दोन्ही कार्यालयातील लोकांनी शक्य तेवढ्या लवकर लसीकरण करून घ्यावे, जेणेकरून हे कार्यालय चालू करता यावे. खालील कारखाने चालू राहू शकतात आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कार्य करू शकतात: आवश्यक सेवेसाठी लागणारा माल तयार करणारे कारखाने आपल्या पूर्ण क्षमतेनुसार चालू राहतील. निर्यात करण्यासाठीचे सामान बनविणारे कारखाने ज्यांना माल बाहेर पाठवायचा आहे. ज्या कारखान्यांमध्ये एकदम काम थांबवता येणार नाही आणि जास्त वेळ लावल्याशिवाय उत्पादन पुन्हा सुरू होऊ शकणार नाही अशा सर्व कारखान्यांना 50 टक्के क्षमते सह काम करता येईल. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने यावर नजर ठेवावी व सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात आहे याची खात्री करावी. हेही वाचा - लॉकडाऊनच्या घोषणेनंतर शहरातून गावाकडे ओढ, किती वाजेपर्यंत करता येणार प्रवास? असे आहेत नवे नियम कामगारांना राहण्याची व्यवस्था असणारे सर्व उद्योग किंवा युनिटमध्ये कामगार त्याच परिसरातील किंवा इतर ठिकाणच्या कारखान्यात काम करत असतील आणि तेथून वाहतूक सोयीस्कर आणि सुरक्षित असेल तर ये जा करता येईल. त्याचप्रमाणे व्यवस्थापनमधील दहा टक्के कर्मचारी अधिकाऱ्यांना बाहेरून येऊन काम करता येईल ज्या स्टाफ मधील कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्याची गरज नाही असे कारखाने वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करू शकतात. व्यवस्थापन, कर्मचारी, प्रशासनामधील स्टाफच्या सगळे कर्मचारी व अधिकाऱ्यांना शक्य तेवढ्या लवकर लसीकरण करून घ्यावे लागतील. जर हे कारखाने भारत सरकारच्या कार्यस्थळ लसीकरण अटीत बसत असतील,तर त्यांना लसीकरणाची व्यवस्था करावी लागेल. कारखाने आणि उत्पादन करणारे युनिट यांना खालील शिस्त पाळाव्या लागतील: -सर्व येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शरीराचा तापमान तपासून नियमांचे पालन करावे लागेल. जर एखादा कर्मचारी कामगार पॉझिटिव्ह आढळला तर त्याच्यासोबत काम करणारे सगळे कर्मचारी व कामगारांना विलगीकरणात घेऊन त्यांना पगार द्यावा लागेल. ज्या कारखाना किंवा कंपनीत 500 पेक्षा जास्त कामगार असतील, त्यांनी स्वतः सुविधा उपलब्ध करावी. सदर केंद्रांमध्ये सर्व मूलभूत सुविधा असाव्यात आणि जर ही सुविधा कंपनीच्या परिसरात बाहेर असेल तर सर्व सुरक्षा उपाय करून पॉझिटिव्ह व्यक्तीला त्या केंद्रापर्यंत घेऊन जावं लागेल. जर एखादा कामगार पॉझिटिव्ह आढळला तर पूर्ण कारखाना सॅनिटाइज करेपर्यंत काम बंद ठेवावं लागेल. गर्दी टाळण्याच्या उद्देशाने भोजन आणि चहाच्या अवकाश यांना बगल द्यावी. सार्वजनिक जेवणासाठी कोणतीही जागा ठेवू नये. सार्वजनिक शौचालय यांना वारंवार सॅनिटाईज करावं. एखादा कामगार पॉझिटिव्ह आढळल्यास तो/ती ला वैद्यकीय रजा द्यावी आणि गैरहजर असल्या कारणाने नोकरीतून बाद करता येणार नाही. अशा कर्मचाऱ्याला तेवढा पगार घेण्याचा अधिकार असेल, जो त्यांना कोरोना झाला नसता तर मिळाला असता. या ठिकाणी नमूद नाही केलेले सगळे उद्योग/कारखाने यांनी आपला उद्योग सदर आदेशामध्ये उल्लेखित कालावधीपर्यंत बंद ठेवावेत, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Business News, Lockdown, Maharashtra, Money, Mumbai, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या