मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आमचं सरकार असताना कुठे ST चं विलीनीकरण झालं, जाणकरांचा भाजपला घरचा अहेर

आमचं सरकार असताना कुठे ST चं विलीनीकरण झालं, जाणकरांचा भाजपला घरचा अहेर

'रस्त्यावर असताना एक बोलावं लागतं आणि आत गेल्यावर एक, असं सर्व काही असतं. त्यामुळे हा सिस्टीमचा भाग आहे'

  • Published by:  sachin Salve

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलडाणा, 21 नोव्हेंबर : ST महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीगीकरण करून घेण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप (ST bus strike )  सुरूच आहे. भाजपचे नेत्यांनी या आंदोलनाची कमान आपल्या हाती घेतली आहे. तर दुसरीकडे, 'आमचं सरकार असताना कुठे ST विलीनीकरण झालं' असं म्हणत रासपचे नेते महादेव जानकर ( mahadev jankar ) यांनी भाजपला घरचा अहेर दिला आहे.

बुलडाण्यात शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांचे आंदोलन झाल्यानंतर तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जानकर शनिवारी बुलडाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

सध्या राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाचा मुद्दा गाजत आहे. राज्य शासनामध्ये आमचं विलीनीकरण करा अशा मागण्या घेऊन एसटी कर्मचारी गेल्या बारा दिवसांपासून संपावर आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष एसटी कर्मचाऱ्यांच्या आणि राज्य शासनाच्या निर्णयाकडे लागून आहे. विरोधी पक्ष नेते, सत्ताधारी एकमेकांवर टीकास्त्र सोडत असतानाच आता रासपचे नेते तसेच माजी मंत्री महादेव जानकर यांनी एक वक्तव्य केलंय.

पंकजाताईंना सुद्धा संधी मिळेल, वर्षभरात खूप स्कोप, चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

'आमचे सरकार असताना कुठं विलीनीकरण झालं होतं, रस्त्यावर असताना एक बोलावं लागतं आणि आत गेल्यावर एक, असं सर्व काही असतं. त्यामुळे हा सिस्टीमचा भाग आहे,  जनतेनं हुशार झाल पाहिजे, हाच एक त्यावरचा पर्याय आहे , असं वक्तव्य जाणकारांनी केलं.  जानकर यांच्या या विधानामुळे नवीन वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

ASCDCL Recruitment: औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इथे नोकरी

बुलडाण्यात शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांचे आंदोलन झाल्यानंतर तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जानकर शनिवारी बुलडाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी, सुधीर मुनगंटीवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये मुनगंटीवार यांनी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून घेता येणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं होतं. हा व्हिडीओ मुनगंटीवार मंत्री असतानाच होता. या व्हिडीओवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा व्हिडीओ प्रसिद्ध करून टीका केली होती.

First published: