• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • अजब! लग्नापूर्वीचा पगार कुठे खर्च केला; पत्नीनं मारहाण केल्यानं युवकाची आत्महत्या

अजब! लग्नापूर्वीचा पगार कुठे खर्च केला; पत्नीनं मारहाण केल्यानं युवकाची आत्महत्या

Crime news: लग्नाच्या अगोदर खर्च केलेल्या पगाराचा हिशोब दे म्हणून एका महिलेनं आपल्या पतीचा छळ केला आहे. पत्नीच्या सततच्या छळाला कंटाळून पीडित पतीनं टोकाचं पाऊल उचललं आहे.

 • Share this:
  आष्टी, 23 जून: कोरोना काळात महिलांपेक्षा पुरुषांचा अधिक छळ झाल्याचा अहवाल अलीकडेच पुणे पोलीस प्रशासनानं जाहीर केला होता. लॉकडाऊनच्या काळात अनेक पुरुषांना पत्नीकडून मानसिक छळाला सामोरं जावं लागलं आहे. अशीच एक घटना आष्टी या ठिकाणी घडली आहे. लग्नाच्या अगोदर खर्च केलेल्या पगाराचा हिशोब दे म्हणून एका महिलेनं आपल्या पतीचा छळ केला आहे. याशिवाय आई वडिलांना पगाराचे पैसे का दिले? असा जाब विचारत मारहाणही (Wife beat husband) केली आहे. त्यामुळे पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पतीनं आत्महत्या (Husband commits suicide) केली आहे. आत्महत्या केल्यानंतर एक महिन्यांनी पत्नीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. अनिल आबासाहेब जगताप असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून ते वनरक्षक पदावर कार्यरत होते. अलीकडेच त्याचा विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच पत्नीनं पतीला त्रास द्यायला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे पत्नीनं लग्नापूर्वीचा पगार काय केला? याचा हिशोब दे म्हणून पतीकडे तगादा लावला होता. शिवाय पगाराचे पैसे आई वडिलांकडे का दिले म्हणून पतीला मारहाणही केली होती. हेही वाचा-अमरावती: घरातच लपलेली पत्नी, संशयातून पतीनं शेजाऱ्याच्या घरी केली जाळपोळ आरोपी पत्नी एवढ्यावरच थांबली नाही, तर शेतजमीन नावावर करून देण्यासाठी पतीचा छळ सुरू केला होता. पत्नीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून पतीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केल्याच्या घटनेला एक महिना उलटून गेल्यानंतर पत्नीसह चौघांवर आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून या घटनेचा तपास सुरू आहे.
  Published by:News18 Desk
  First published: