कर्जमाफीच्या यादीतील 13 लाख शेतकरी गेले कुठे?

कर्जमाफीच्या यादीतील 13 लाख शेतकरी गेले कुठे?

स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने सरकारला दिलेली ८९ लाख शेतकऱ्यांची आकडेवारीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण, याच कमिटीने आधी दिलेल्या खातेदारांची संख्या तब्बल १३ लाख ३६ हजारांनी कमी केली आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांवर संशयाची सुई रोखली गेली आहे.

  • Share this:

10 ऑक्टोबर: राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजना, अर्थात कर्जमाफीसाठी स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने सरकारला दिलेली ८९ लाख शेतकऱ्यांची आकडेवारीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण, याच कमिटीने आधी दिलेल्या खातेदारांची संख्या तब्बल १३ लाख ३६ हजारांनी कमी केली आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांवर संशयाची सुई रोखली गेली आहे.

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सुरू होताच ३३पैकी पाच प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांच्याकडील शेतकरी खातेदारांची संख्या अवघ्या काही दिवसात लाखांनी कमी केली आहे. त्यामुळे कोट्यावधींचा सरकारी निधी हडप करणारी यंत्रणा बँकांच्या पातळीवर काम तर करत नाही ना असा संशय व्यक्त केला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा करताना ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं जाहीर केलं होतं.

हा आकडा एसएलबीसीने मुख्यमंत्र्यांना दिला होता. पण त्यातील 13 लाखाने ही संख्या शेतकऱ्यानी कमी केली आहे.

First Published: Oct 10, 2017 10:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading