अमरावती, 10 जुलै: मागील दीड वर्षांहून अधिक काळापासून जगभर कोरोना विषाणूनं थैमान (corona pandemic) घातलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक क्षेत्र कोलमडून गेली आहेत. शिक्षण क्षेत्रालाही (Education Sector) याचा मोठा फटका बसला आहे. अनेक विद्यार्थांवर शाळा सोडण्याची वेळ आली आहे. तर काही शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणाचा (Online education) मार्ग स्विकारला आहे. अशात सध्या राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे राज्यात महाविद्यालये पुन्हा कधी सुरू होणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात महाविद्यालये कधी सुरू होणार याबाबत महत्त्वाचे संकेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (minister uday samant) यांनी दिले आहेत. राज्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होतं असली तरी, धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत महाविद्यालये पुन्हा सुरू करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तूर्तास महाविद्यालये किंवा शाळा सुरू करण्याचा सरकारचा मानस अजिबात नाहीये. एका शासकीय बेठकीसाठी अमरावतीत आले, असता त्यांनी ही माहिती दिली आहे.
हेही वाचा-5 वी पासून विद्यार्थ्यांना मोफत कंडोम; 'या' शाळांच्या नव्या पॉलिसीमुळे गदारोळ
यावेळी त्यांनी महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याबाबतही सूचक विधान केलं आहे. रिक्त पदांवर शिक्षण भरती करण्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. विद्यापीठांमधील शेकडो पदे रिक्त असली तरी नियमानुसार तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची तसेच कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार विद्यापीठांना देण्यात आला आहे. त्यांचा अधिकार त्यांनी वापरला पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा-मुंबईच्या Income Tax विभागात 155 जागांसाठी होणार भरती; 'या' तारखेआधी करा अर्ज
पुढील आणखी काही दिवस राज्यात ऑनलाइन शिक्षणाचाच अवलंब करण्यात येईल. त्याचबरोबर विद्यापीठ परीक्षांमध्ये होणाऱ्या गोंधळाला आळा घालण्यासाठी पुढील काळात परीक्षा तसेच गोपनीय विभागामध्ये कंत्राटी लोकांना नियुक्ती करण्यास मज्जाव करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.