कुलगुरू संजय देशमुखांवर कारवाई कधी ?, अधिवेशनात गोंधळ

कुलगुरू संजय देशमुखांवर कारवाई कधी ?, अधिवेशनात गोंधळ

मात्र शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कारवाईच्या मुद्याला ऐनवेळी बगल देत, निकाल लावण्याला प्राथमिकता देण्याची ढाल पुढे केली.

  • Share this:

28 जुलै : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल अजूनही लागलेले नाहीत. पेपर तपासणीचा प्रचंड गोंधळ मुंबई विद्यापीठात झालेला असतानाच याचा ठपका कुलगुरू संजय देशमुखांवर ठेवण्यात आला. यामुळेच विधानसभेतील सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी कुलगुरुंवर कारवाईची मागणीही केली. मात्र शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कारवाईच्या मुद्याला ऐनवेळी बगल देत, निकाल लावण्याला प्राथमिकता देण्याची ढाल पुढे केली.

विद्यापीठाने घेतलेल्या 477 पैकी केवळ 51 परिक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. सध्या कॅप केंद्रावर प्रचंड गोंधळ सुरू आहे. निकालाची डेडलाईन पाळण्यासाठी नागपूर विद्यापीठाची मदत घेतली जातेय. पण तिथे अद्यापही यंत्रणा सुरू झालेली नाही. मुंबई विद्यापीठाच्या प्रतिसाद न मिळाल्याने कोल्हापूरचे 750 शिक्षक उत्तरपत्रिका मिळायची वाट पाहत बसले आहेत. यामुळे कुलगुरूंवर कारवाई व्हावी अशी मागणी आमदार करत होते. मात्र, कुलगुरूंवर कारवाई राज्यपाल करतील असं तावडे म्हणाले. ऐनवेळी तावडेंनी हस्तक्षेप केल्याने आणि निकाल लावण्याला त्यांनी प्राथमिकता दिल्याने कारवाईचा मुद्दा अखेर बाजूला पडला.

First published: July 28, 2017, 4:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading