जळगाव, 26 जुलै : 'राज्यावर मोठे संकट आहे. अशात राजकारण करायला नको. राज्यावर आलेल्या संकटाबाबत नारायण राणे (narayan rane) यांनी मुख्यमंत्री हे पांढऱ्या पायाचे असल्याने राज्यावर संकट आल्याचे वक्तव्य केले. परंतु, राणे हे केंद्रीय मंत्री झाले व कोकणावर संकट आले म्हणजेच राणेच पांढऱ्या पायाचे आहे, असा सणसणीत टोला शिवसेनेचे नेते आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील ( gulabrao patil) यांनी लगावला.
राज्यावर अस्मानी संकट (konkan flood) कोसळले आहे. अनेक निष्पाप लोकांचा यात बळी गेला आहे तर शेकडो लोकांचे संसार उद्धवस्त झाले आहे. पण, अशाही परिस्थितीत राजकीय आरोप सुरू झाले आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणाच्या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली होती.
शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांचा नारायण राणेंवर जोरदार पलटवार pic.twitter.com/2DkSWQEul4
— News18Lokmat (@News18lokmat) July 26, 2021
आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जळगावात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आपल्या स्टाईलमध्ये राणेंवर सडकून टीका केली.
'नारायण राणे हे नुकतेच केंद्रात मंत्री झाले आहे. ते कोकणाचे असून मंत्री झाले आहे. त्यामुळेच तेच पांढऱ्या पायाचे आहे, असा सणसणीत टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.
VIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...
'खरंतर राज्यावर आलेल्या संकटावर राजकारण करू नये. आलेल्या संकटात व्यक्ती म्हणून सर्वतोपरी मदत करायला हवी. माणसाने माणसाला मदत करायला एकसुती लढा द्यायला हवा. राजकारण करायला खूप आखाडे आहेत. जेव्हा वेळ असते तेव्हा तुमचा झेंडा घेवून तुम्ही उतरा आमचा झेंडा घेवून आम्ही आखाड्यात उतरू. मात्र राज्य संकटात असताना राजकारण करणे योग्य नाही, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी राणेंना सुनावले.
चेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका?
तसंच, जी लोक संकटात सापडली आहे, त्यांना व्यक्ती म्हणून मदत करायची असते. तो कुठल्या राजकीय पक्षाचा आहे हे महत्त्वाचं नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत राजकारण करणे चुकीचे आहे. तुमच्या घरातलं कुणी असं अडकलं असतं तर तुमच्या लक्षात आले असते, असंही गुलाबराव पाटील म्हणले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gulabrao patil, गुलाबराव पाटील