मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सुप्रीम कोर्टात मराठी! जेव्हा जस्टिस चंद्रचूड वकील हरिश साळवेंना म्हणतात, 'जाऊ द्या'; वाचा नेमकं काय घडलं

सुप्रीम कोर्टात मराठी! जेव्हा जस्टिस चंद्रचूड वकील हरिश साळवेंना म्हणतात, 'जाऊ द्या'; वाचा नेमकं काय घडलं

वेदांताची बाजू मांडणारे अॅडव्होकेट हरिश साळवे यांच्या एका वक्तव्यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी त्यांना शांत करत मराठीत जाऊ द्या, असं म्हटलं.

वेदांताची बाजू मांडणारे अॅडव्होकेट हरिश साळवे यांच्या एका वक्तव्यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी त्यांना शांत करत मराठीत जाऊ द्या, असं म्हटलं.

वेदांताची बाजू मांडणारे अॅडव्होकेट हरिश साळवे यांच्या एका वक्तव्यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी त्यांना शांत करत मराठीत जाऊ द्या, असं म्हटलं.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 27 एप्रिल: सुप्रीम कोर्ट म्हटलं की याठिकाणी अत्यंत गंभीरपणे काम चालतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यात देशाच्या या सर्वोच्च न्यायालयात सर्व कामकाज हे शक्यतो इंग्रजी भाषेत चालतं. पण एका सुनावणीदरम्यान जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court of India) एक न्यायाधीश वकिलांना चक्क मराठीत जाऊ द्या म्हणाले तेव्हा याबाबत सगळीकडं चर्चा सुरू झाली. हे न्यायाधीश म्हणजे जस्टीस चंद्रचूड (Justice Chandrachud) आणि वकील होते अ‍ॅडव्होकेट हरिश साळवे (Harish Salve). देशात कोरोनाचा मुद्दा सध्या चांगलाच पेटलेला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने विविध ठिकाणि ऑक्सिजनची निर्मिती आणि त्याचा पुरवठा याकडं लक्ष दिलं जातंय. अशाच एका ऑक्सिजनशी संबंधित मुद्द्यावरील सुनावणीदरम्यानच हा प्रसंग घडला आहे. तामिळनाडूच्या वेदांता ऑक्सिजन प्लांट बाबत ही सुनावणी सुरू होती. त्यावेळी कोरोनाचं संकट पाहून हा प्लांट सुरू करण्यात आल्याचं न्यायालयाला सांगण्यात आलं. पण याठिकाणी तयार होणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा कुणाला करायचा यावरून वाद प्रतिवाद सुरू होता. या दरम्यान वेदांताची बाजू मांडणारे अ‍ॅडव्होकेट हरिश साळवे यांच्या एका वक्तव्यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी त्यांना शांत करत मराठीत 'जाऊ द्या', असं म्हटलं. (हे वाचा-कोरोना आकडेवारीत तफावत; वर्धा जिल्ह्यात कोरोना बाधित किती आणि मृत्यू किती?) न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा जन्म महाराष्ट्रात एका मराठी कुटुंबामध्ये झालेला आहे. त्यांचे वडील सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होते. न्यायमू्र्ती चंद्रचूड यांचं शालेय शिक्षणही मुंबईतच झालेलं आहे. तर अ‍ॅडव्होकेट हरिश साळवे हे भारतातील प्रसिद्ध वकील आहेत. तेही महाराष्ट्रातील आहेत. अनेक मोठे खटले हरिश साळवे यांनी लढले आहेत. पाकिस्तानात अडकलेले कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांनीच लढवला होता. (हे वाचा-'पार्टी' आम्ही देऊ, Birthday Boyच्या प्रश्नावर पुणे पोलिसांचा कडक रिप्लाय!) तर ही दोन मराठी माणसं सुप्रीम कोर्टात एकत्र आली तेव्हा अगदी सहज आणि नकळतपणे त्यांच्यामध्ये अगदी दोन शब्दांचा हा मराठी संवाद झाला. पण त्याची चर्चा मात्र होत आहे. पण दोन मराठी माणसं समोरा-समोर असतील तर आपसूकच असे मराठी शब्द तोंडातून बाहेर येणारच ना.
First published:

Tags: India, Maharashtra, Marathi language, Supreme court

पुढील बातम्या