• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'मी जेव्हा गाडीत बसले तेव्हा बोटं तुटल्याचं जाणवलं', कल्पिता पिंपळेंनी सांगितला हल्ल्याचा प्रसंग VIDEO

'मी जेव्हा गाडीत बसले तेव्हा बोटं तुटल्याचं जाणवलं', कल्पिता पिंपळेंनी सांगितला हल्ल्याचा प्रसंग VIDEO

'आम्ही कर्तव्यावर असताना अशा प्रकारचा हल्ला केला जातो, त्यामुळे वाईट वाटलं. अशा हल्ल्यांना मी घाबरणार नाही'

'आम्ही कर्तव्यावर असताना अशा प्रकारचा हल्ला केला जातो, त्यामुळे वाईट वाटलं. अशा हल्ल्यांना मी घाबरणार नाही'

'आम्ही कर्तव्यावर असताना अशा प्रकारचा हल्ला केला जातो, त्यामुळे वाईट वाटलं. अशा हल्ल्यांना मी घाबरणार नाही'

  • Share this:
ठाणे, 31 ऑगस्ट : 'आम्ही अनधिकृत फेरीवाल्यांवर (hookers ) कारवाई करण्यासाठी पोहोचलो तेव्हा एकाने माझ्या थोबाडीत मारली, त्यानंतर मी गाडीत बसले तेव्हा बोट तुटल्याचं कळालं खूप त्रास झाला, अशी प्रतिक्रिया ठाणे पालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळेंनी  (Assistant Commissioner Kalpita Pimple) दिली. तसंच, अशा हल्ल्यांना मी घाबरत नाही, बरी झाल्यानंतर माझं काम करणारच, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. ठाण्यात फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना एका भाजीविक्रेत्यानेठाणे पालिकेच्या सहाय्यक आयुक्त  कल्पिता पिंगळे यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताची दोन बोट छाटली गेली आहे. त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. आज त्यांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला यावेळी त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. 'मी कारवाई करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी हजर होते, ते पाहण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी मी गाडीतून उतरले तेव्हा अचानक माझ्यावर हल्ला झाला. माझ्या थोबाडीत मारली त्यामुळे मला काय झाले हे सुचले नाही. त्यानंतर एकाने त्याला ढकलून दिले. मी जेव्हा गाडीत बसले तेव्हा माझी बोट तुटली हे लक्षात आलं. प्रचंड रक्त वाहत होतं. खूप त्रास होत होता, रक्त प्रवाह थांबण्याचे नाव घेत नव्हता, असं कल्पिता पिंगळेंनी सांगितलं. सामान्य प्रशासन विभाग मुंबई इथे नोकरीची संधी; 2 लाखांपर्यंत मिळणार पगार तसंच, 'आम्ही कर्तव्यावर असताना अशा प्रकारचा हल्ला केला जातो, त्यामुळे वाईट वाटलं. अशा हल्ल्यांना मी घाबरणार नाही. कासारवडवली येथे फेरीवाल्यांमुळे खूप वाहतूक कोंडी होत असते.  मी बरी झाले की पुन्हा माझं काम करणार, अशा गोष्टींना घाबरणार नाही, असंही पिंगळे यांनी ठणकावून सांगितलं. काय घडलं नेमकं? ठाणे  महापालिकेकडून सध्या शहरातील अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहिम उघडली आहे. आज संध्याकाळी माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांच्या पथकाने घोडबंदर भागातील कासारवडवली येथील मार्केटवर कारवाई केली. त्यावेळी फेरीवाल्यांनी त्यांचे रस्ते अडवले. यावेळी फेरीवाले आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष पेटला. कोल्ड्रिंकच्या उधारीवरून केला खून, किरकोळ रकमेसाठी टेलरने चहावाल्याला भोसकले त्याचवेळी यादव नावाच्या या भाजीविक्रेत्याने रागाच्या भरात पिंगळे यांच्यावर चाकू फेकून मारला. पिंगळे यांनी तो हल्ला रोखण्यासाठी हाताने अडकवला. पण, यात त्यांची तीन बोट छाटली गेली आणि जागेवरच तुटून पडली.त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या सुरक्षारक्षकाने धाव घेतली असता आरोपी यादवने त्याच्यावरही वार केले. या हल्ल्यात त्याचेही बोट तुटले. कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या सुरक्षारक्षकाला  ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर यादवला पोलिसांनी अटक केली आहे. राज ठाकरेंनी दिला खळ्ळखट्याकचा इशारा दरम्यान, फेरीवाल्यांच्या हल्ल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. 'पोलिसांकडून ज्या दिवशी तो सुटेल त्या दिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सगळी बोटं छाटली जातील आणि यांना फेरिवाला म्हणून फिरता येणार नाही, त्या दिवशी यांना कळेल. हिंमत कशी होते यांची. निषेध करुन ही लोक सुधरणारी नाहीयेत. आम्ही हे वारंवार सांगत होतो. यांची हिंमत ठेचलीच पाहिजे. महाराष्ट्रातील शासकीय अधिकाऱ्याची बोट छाटली जातात? असा सवाल राज यांनी उपस्थितीत करत कडक इशारा दिला.
Published by:sachin Salve
First published: