...आणि अजित पवारही क्षणभर भाऊक झाले !

...आणि अजित पवारही क्षणभर भाऊक झाले !

अजित हे खरंतर रोखठोक राजकीय नेतृत्व, एरवी आपल्या मिश्कील आणि रोखठोक भाषणाने ते श्रोत्यांमध्ये नेहमीच हशा आणि टाळ्या वसूल करत असतात. पण बारामतीच्या एका कार्यक्रमात शरद पवारांविषयी गौरगोद्वार काढताना हेच अजित अजित काही क्षण भाऊक झाल्याचे पहिल्यांदाच बघायला मिळालं. निमित्त होतं, बारामतीतील तीन हजार मुलींना सायकल वाटपाच्या कार्यक्रमाचं !

  • Share this:

बारामती, 5 ऑक्टोबर : अजित हे खरंतर रोखठोक राजकीय नेतृत्व, एरवी आपल्या मिश्कील आणि रोखठोक भाषणाने ते श्रोत्यांमध्ये नेहमीच हशा आणि टाळ्या वसूल करत असतात. पण बारामतीच्या एका कार्यक्रमात शरद पवारांविषयी गौरगोद्वार काढताना हेच अजित अजित काही क्षण भाऊक झाल्याचे पहिल्यांदाच बघायला मिळालं. निमित्त होतं, तीन हजार मुलींना सायकल वाटपाच्या कार्यक्रमाचं !

या कार्यक्रमात भाषणाला उभारल्यानंतर अजित पवारांच्या तोंडून शरद पवारांविषयी गौरवोद्गार काढताना शरद पौर्णिमेचा उल्लेख आला आणि लागलीच काही क्षण त्यांचा कंठ दाटून आला, काही क्षण ते तसेच शांत राहिले पण यावेळी त्यांचे डोळे भरुन आल्याचं काही लपून राहिलं नाही. त्यांचा आवाजही काहिसा कापरा झाला. ते काही क्षण सभागृह देखील स्तब्ध झाले होते.

या भाऊक क्षणांमधून स्वतःला सावरल्यानंतर अजित पवारांनी पाणी मागितलं, पाण्याचे दोन घोट घेतल्यानंतरच ते पुन्हा बोलू लागले, ''खरंतरं भाषण करताना माझं असं कधी होत नाही, आज पहिल्यांदाच असे घडले,'' असे बोलतानाही त्यांचा आवाज कातर झाला होता. मात्र, यावेळी व्यासपीठावर उपस्थित सुप्रिया सुळे व खुद्द शरद पवार यांनाही गहिवरुन आले होते.

खरंतर अजित पवार हे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या सडेतोड स्वभावाविषयी ओळखले जातात. आजही अनेक कार्यकर्ते त्यांच्यासमोर बोलायलाही कचरतात कारण अजितदादा कधी फटकारतील याचा नेम नसतो. एक घाव दोन तुकडे असा त्यांचा खाक्या, ओटात एक आणि पोटात दुसरंच असं त्यांचं कधीच नसतं. त्यामुळे भाषणादरम्यान, अजित पवार भावणिक झाल्याचं आजवर सहसा कुणीच पाहिलं नसेल. पण आज शरद पवारांचं नाव तोंडावर येताच हा रांगडा नेताही काही क्षण भावणिक झाल्याचं पहिल्यांच बघायला मिळालं. शरद पवारांना आपण दैवत मानत असल्याचं ते आपल्या भाषणातून नेहमीच सांगत असतात. पण आज पहिल्यादांच उपस्थितांनाही त्याची अनुभूती बघायला मिळाली.

First published: October 5, 2017, 10:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading