मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मविआमध्ये काय सुरू आहे? शिवसेना माजी आमदाराची धक्कादायक घोषणा!

मविआमध्ये काय सुरू आहे? शिवसेना माजी आमदाराची धक्कादायक घोषणा!

शिंदे सरकारला एकूण 164 मतं मिळाली आहे. तर महाविकास आघाडीला फक्त 99 मतं मिळाली.

शिंदे सरकारला एकूण 164 मतं मिळाली आहे. तर महाविकास आघाडीला फक्त 99 मतं मिळाली.

शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडखोरीनंतरही महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद थांबायला तयार नाही.

मुंबई, 1 ऑगस्ट : शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडखोरीनंतरही महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद थांबायला तयार नाही. नाशिकमधील शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सरोज आहीरे यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका असो किंवा कोणत्याही निवडणूक असो त्या स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. योगेश घोलप हे बबनराव घोलप यांचे सुपुत्र असून खासदारांच्या बंडखोरीनंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ज्या बबन घोलपांना उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहे, त्याच बबन घोलपांचे पुत्र योगेश घोलप यांनी अशा प्रकारे नाराजी व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे संजय राऊतांना अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांना विशेष ईडी न्यायालयाने (ED Court) 4 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने केलेल्या तपासात प्रथमदर्शनी संजय राऊत यांचा सहभाग असल्याचं आढळून येत आहे, असं मत न्यायाधिशांनी मांडलं. प्रविण राऊत (Pravin Raut) पत्रा चाळीची डेव्हलपमेंट पाहत होता. त्याला HDIL कडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातले 1 कोटी 6 लाख 44 हजार वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. संजय राऊत आणि वर्षा राऊत यांना परत प्रविण राऊतने 37 कोटी दिले, नंतर त्यातून त्यांनी दादरमध्ये फ्लॅट घेतला, तसंच अलिबागची जमीनही विकत घेण्यात आली, असा गंभीर आरोप ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी केला.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Nashik, NCP, Shivsena, काँग्रेस

पुढील बातम्या