मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शहरांची नावं बदलून काय साध्य होणार? बाळासाहेब थोरातांचा थेट सवाल

शहरांची नावं बदलून काय साध्य होणार? बाळासाहेब थोरातांचा थेट सवाल

 देशात अनेक शहरं आणि गावांची नावं बदलली. पण, नावं बदलल्यामुळे तिथल्या नागरिकांच्या आयुष्यात काही बदल झाला का?

देशात अनेक शहरं आणि गावांची नावं बदलली. पण, नावं बदलल्यामुळे तिथल्या नागरिकांच्या आयुष्यात काही बदल झाला का?

देशात अनेक शहरं आणि गावांची नावं बदलली. पण, नावं बदलल्यामुळे तिथल्या नागरिकांच्या आयुष्यात काही बदल झाला का?

शिर्डी, 01 जानेवारी : औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या नामकरणावरून काँग्रेसने (Congress) विरोधात भूमिका घेतल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे. पण, 'शहरांच्या नामकरणाला काँग्रेसचा सातत्याने विरोध राहिला आहे. शहरांची नावं बदलून काय साध्य होणार? नामकरण करण्यापेक्षा सर्वसामान्याचं जिवन कसं बदलेल हे पाहणं गरजेचं आहे, असं परखड मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb Thorat) यांनी व्यक्त केले आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे शिर्डीच्या दौऱ्यावर होते. यावेळी औरंगाबादच्या नामकरण वादावर  थोरात यांनी परखड भूमिका मांडली. तसंच, या वादावर भाजपला बोलण्याचा अधिकार नाही, असा टोलाही थोरातांनी फडणवीसांना लगावला.

मोठी बातमी, संजय राऊत यांच्या पत्नीबद्दल ईडीने केला नवीन खुलासा

'काँग्रेसने नेहमीच शहरांची नाव बदलण्यास विरोध केला आहे. शहरांची नावं बदलून काय साध्य होणार आहे. शेवटी सर्व सामान्य नागरिकाच्या आयुष्यात कसा बदल होईल, हे महत्त्वाचे आहे. देशात अनेक शहरं आणि गावांची नावं बदलली. पण, नावं बदलल्यामुळे तिथल्या नागरिकाच्या आयुष्यात काही बदल झाला का? हे महत्त्वाचे आहे. लोकांच्या आयुष्यात बदल घडवता आला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असं थोरात म्हणाले.

नव वर्षाच्या पहिल्या दिवशी पाककडून सीमेवर गोळीबार; शत्रूशी लढताना 1 जवान शहीद

'औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराज यांचे नाव द्यावे असा प्रस्ताव आम्ही केला होता. गेली 6 महिने हा प्रस्ताव केंद्रामध्ये पडून आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी या प्रस्तावाबद्दल केंद्राकडे मेहनत घ्यावी. मुळात मागील पाच वर्ष राज्यात भाजपचे सरकार होते तेव्हा औरंगाबादचे नामकरण का केलं नाही? असा सवालही उपस्थित करत आमच्या श्रद्धास्थांनाचे कोणीही राजकारण करू नये, असा इशाराही थोरातांनी दिला.

'छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आमचे दैवत आहेत. पण भारतीय जनता पक्षाला यावर बोलण्याचा अधिकार नाही. आरएसएसने संभाजी महाराजांबद्दल केलेलं लिखाण अतिशय कटू आहे. निवडणूक आली की, भावनेचं राजकारण करायचं काम मनसे आणि भाजप करत असल्याची टीका थोरातांनी केली.

First published:
top videos