Home /News /maharashtra /

NPR मुळे कुणाचंही नुकसान नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

NPR मुळे कुणाचंही नुकसान नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

    नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तब्बल सव्वा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीत राज्यातील समस्या, जीएसटी आणि पिक विम्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी मदतीची मागणी मोदींकडे केली. तसंच CAA आणि NPR बद्दलही चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.  महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून ही माझी पहिली भेट आहे. राज्य आणि केंद्र समन्वय याबाबत चर्चा झाली. या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्र राज्याच्या ज्या काही आवश्यकता आहे. त्याबद्दल चर्चा झाली आहे. राजकीय वाद आणि चर्चा या आपल्या ठिकाणी आहे. पण, देशासाठी महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. पूर्ण मदत मिळावी अशी मागणी मोदींकडे केली. त्यांनीही जे चांगले उपक्रम आहे, त्याला नक्की मदत करणार अशी आश्वासन दिलं आहे, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. 'कुणाचेही अधिकार हिरावून देणार नाही' मोदी यांच्यासोबत CAA कायदा आणि NRC, NPR बद्दल चर्चा झाली. CAA बद्दल घाबरण्याचे कारण नाही. देशात कुणालाही काढण्यासाठी कायदा होऊ नये. याआधीच आपण भूमिका मांडली आहे. तीच भूमिका कायम आहे. जर यात काही चुकीचं असेल तर त्यावरून वाद होईलच. परंतु, केंद्राने आधीच स्पष्ट केलं आहे की देशात  NPR लागू होणार नाही. 'जीएसटीतून पैसा येत नाही' जीएसटीबद्दलही पंतप्रधान मोदी यांना सांगितलं आहे. जीएसटीतून पैसा मिळत नाही. शेतकरीही अडचणीत आहे. पंतप्रधान विमा योजनेचा पैसाही शेतकऱ्यांना मिळत नाही. 'राज्यपाल आणि सरकारमध्ये वाद नाही' राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये कोणताही वाद नाही. कोणतीही ठिणगी पेटलेली नाही. अधिवेशन तोंडावर आले आहे, त्यामुळे त्यांच्या काही सुचना असतील त्या स्वीकारल्या जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 9 वाजता केंद्रीय गृह मंत्री यांची अमित शहा यांची भेट दरम्यान, ठाकरे सरकारला आता तीन महिने होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दिल्लीत पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटणार असल्याचं म्हटलं होतं.  त्यामुळे या भेटीत काय चर्चा होते याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Narendra modi, PM narendra modi

    पुढील बातम्या