' लॉकडाऊनचं काय करायचं...' उद्धव ठाकरेंच्या संवादामधले 10 महत्त्वाचे मुद्दे

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांवर जनतेशी संवाद साधला

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांवर जनतेशी संवाद साधला

  • Share this:
    मुंबई, 8 मे : राज्यात कोरोना (Covid -19) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आज औरंगाबाद येथे झालेल्या मजुरांच्या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आणि मजुरांनी अशा प्रकारचा धोका पत्करू नये असं आवाहन केलं. मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरत आहे. मात्र ही निव्वळ अफवा आहे. त्यावर  विश्वास ठेवू नका, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सर्वपक्षीय बैठकीबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. राजकारण बाजूला ठेवून एकजूट असल्यामुळे आत्मविश्वास दुणावला आहे, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे - 1 अफवांना बळी पडू नका. आजच्या घटनेतही अफवेचेच बळी ठरले. भुसावळला हे कामगार रेल्वे ट्रॅकवरून चालत निघाले होते. भुसावळहून ट्रेन सुटेल हे त्यांना कुणी सांगितलं? औरंगाबादहून गाडी निघणार होती. करमाड गावात थकून बसले. डोळा लागला आणि दुर्दैवाचा घाला आला. मजूरांना अनेकदा सांगितलं आहे की तुम्ही बैचेन होऊ नका, राज्य सरकार तुमच्या सोबत आहे. जवळपास 5 ते 6 लाख मजुरांची राहण्याची व खाण्याची सोय राज्यभरात केली आहे. मजुरांना पोहोचविण्यासाठी ट्रेनची सोय केली आहे. मात्र असे करताना गर्दी होऊ देऊ नका..अन्यथा पुन्हा सर्व ठप्प होईल 2 सर्व राजकीय पक्षांची एकजूट झाली याचा आनंद आहे 3 मुंबईत लष्कर येणार अशी अफवा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र ही निव्वळ अफवा आहे. मुंबईत टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय काहीही करणार नाही. तुम्हीच सैनिक आहात. लष्कर मुंबईत येणार नाही. तुम्हीच काळजी घ्यायची आवश्यकता आहे. गैरसमज, गोंधळ नको म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो आहे. 4अधिकच मनुष्यबळ लागलं तर ते केंद्र सरकारकडे कदाचित मागणी करू. याशिवाय गरज पडल्यास लष्कराच्या रुग्णालयांची मदत घेतली जाईल. 5 महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेत्यांशी बैठक झाली. उणिवा आणि सुचनांवर चर्चा झाली. बऱ्याच सूचना आपण अंमलात आणतोय. सर्व पक्षीय एकजूट दिसून आली. 6 मी काही दिवसांपूर्वी बीकेसी मधील कोविड 19 रुग्णालयाची पहाणी केली. असेच रुग्णालय आपण रेसकोर्सला ही उभारतोय. केंद्राकडे आपण डिफेन्स आणि इतर केंद्रीय यंत्रणांचे रुग्णालय उपलब्ध करण्याचे मागणी केली ती मान्यही झाली. 7 पोलीसदेखील या आजाराला बळी पडतायेत. केंद्र सरकारला सांगायचे आहे की पोलिसांना काही दिवस आराम करण्यासाठी वेळ दिला तर अधिक मनुष्यबळ लागण्याची गरज आहे. त्यामुळे गेले महिनाभर थकलेल्या पोलिसांना थोडा  टप्या टप्याने विसावा देण्यासाठी आपण केंद्राकडून अतिरिक्त सुरक्षा यंत्रणांची मागणी करणार आहोत. याचा अर्थ कुणीही चुकीचा काढू नये. 8 कोविड योद्धांची ही काळजी घेणं महत्वाची आहे. लाॅकडाऊन वाढवायचा कि नाही हे तुम्ही शिस्त पाळलीत की नाही यावरच अवलंबून आहे. शिस्त बिघडेल तर बंधन वाढेल. 9 पुढचा काही काळ आता मास्क बंधनकारक असेल. 10 कोविड १९ च्या चाचण्या सुरूच रहातील. कोविड १९ रुग्णं काही जण शेवटच्या टप्यात येत आहेत. तसं न करता लक्षणं दिसल्यास तात्काळ उपचार करून घ्या. संबंधित -पुण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणार मोठी वाढ; 9000 क्वारंटाइन बेड्सची तयारी
    First published: