PMC मध्ये असलेल्या तुमच्या पैशांचे काय होणार? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं

PMC मध्ये असलेल्या तुमच्या पैशांचे काय होणार? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेनं सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध घातले आहेत.

  • Share this:

मुंबई, 25 सप्टेंबर : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयनं सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादल्यानं प्रचंड गोंधळ उडाला आहे. सोमवारपासून हे निर्बंध लागू झाले आहेत. बँकेच्या ग्राहकांना पैशांची चिंता लागून राहिली आहे. बँकेत असलेल्या पैशांचे काय होणार असा प्रश्न विचारला जात आहे.

रिझर्व्ह बँकेच्या नोटिफिकेशननुसार पीएमसी बँकेच्या अकाउंटवरून कर्जाचा हप्ता जात असेल तर तुमच्या खात्यात असलेल्या पैशातून हप्ता कट होईल. जर तुमच्या खात्यावर पैसै नसतील तर तुम्हाला पैसे भरावे लागतील.

पीएमसी बँकेच्या खात्यावरून जर तुम्ही एसआयपी किंवा म्यूच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल तर त्यावर परिणाम होईल. कोणत्याही गुंतवणूकीसाठी तुम्हाला दुसरं खातं लिंक करावं लागेल. असं नाही झालं तर रिझर्व्ह बँक बंदी हटवेपर्यंत तुम्हाला म्युच्यूअल फंडाचा लाभ घेता येणार नाही.

बँक दिवाळखोरीत निघाली तरी तुमचे पैसे बुडणार नाहीत. अशा स्थितीत खातेधारकांच्या खात्यावर असलेल्या विम्याच्या माध्यामातून एक लाख रुपयांपर्यंत रक्कम परत मिळेल. एकूण बचित जास्त असेल तर त्यापैकी काही भाग मिळू शकतो.

रिझर्व्ह बँकेनं पीएमसी बँकेवर निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असून त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल. सध्या रिझर्व्ह बँकेनं बँक कर्मचाऱ्यांना वेतन, दैनिक खर्च, व्याज इत्यादी देण्यास परवानगी दिली आहे.

पुरामुळे 20 दिवसांपासून गावाचा संपर्क तुटला; भीषण अवस्था दाखवणारा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: September 25, 2019, 8:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading