पवार कुटुंबीयांवर अटकेची तलवार; महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणारा राज्य सहकारी बँक घोटाळा आहे तरी काय?

पवार कुटुंबीयांवर अटकेची तलवार; महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणारा राज्य सहकारी बँक घोटाळा आहे तरी काय?

राष्ट्रवादीचे अध्वर्यू शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ED ने गुन्हा दाखल केला आहे. हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरण आहे तरी काय?

  • Share this:

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर :  महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी  (bank scam Money Laundering Case) शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवारांसह (Ajit Pawar) सर्व माजी संचालकांवर ED Enforcement Directorate ने गुन्हा दाखल केला आहे. सक्तवसुली संचालनालयाने महाराष्ट्रात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा राजकीय भूकंप घडवल्याचं बोललं जात आहे. (Maharashtra assembly election) विधानसभा निवडणुकीच्या अगदी काही दिवस आधी सक्तवसुली संचालयाकडून हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिल्यानंतर आता ED ने गुन्हा दाखल केला आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला. त्यामुळे अजित पवार यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकर नेमकं आहे तरी काय?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अत्यंत मनमानी पद्धतीने कर्जवाटप केलं होतं. या कर्जवाटपामुळे बँकेला 10 हजार कोटींचा फटका बसला होता.

संबंधित : निवडणुकीच्या आधी EDचा दणका, शरद पवार आणि अजित पवारांवर गुन्हा दाखल!

या घोटाळ्याप्रकरणी अण्णा हजारेंनी तीन वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. नंतर त्यावर चौकशी समितीही नेमली गेली. त्याच्या अहवालानंतर कोर्टानं गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणारा राज्य सहकारी बँक घोटाळा आहे तरी काय?

काय आहे राज्य सहकारी बँकेचा घोटाळ्याचा आरोप?

- 2005 ते 2010 या कालावधीत राज्य सहकारी शिखर बँकेवर वर्चस्व असणाऱ्या संचालक मंडळांनी नियमबाह्य कर्जाचे वितरण केलं.

- राज्यातल्या अनेक सहकारी साखर कारखाने सूतगिरण्या यासह अनेक सहकारी संस्थांना कर्जाचं वाटप केलं गेलं.

- हे सर्व कर्ज नियमबाह्य पद्धतीने दिले गेले. साधारण त्याची रक्कम पंधराशे कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

- अजित पवारांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव पाटील राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना बहुतेक कर्ज दिलं गेलं. यावरून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली.

- राज्य सहकारी बँकेला या सर्व प्रकरणामुळे आर्थिक नुकसान तर झालेच पण स्वतःच्या सहकारी संस्थांसाठी नियमबाह्य कर्ज देत मोठ्या प्रमाणात फायदा मिळवल्याचा आरोप या याचिकेत केला गेला आहे.

हे वाचा - काँग्रेस कार्यकर्त्याचं सोनियांना रक्ताने पत्र, राज्यात 'या' पक्षाबर आघाडी नको

==================================================================================================

VIDEO : शरद पवार काय म्हणाले पाहा

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: September 24, 2019, 8:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading