मराठा आंदोलनाबाबत राणे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं ?

मराठा आंदोलनाबाबत राणे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं ?

आरक्षणवरून मराठा समाजाचा उद्रेक झालाय. आंदोलन चिघळू नये म्हणून हस्तक्षेप करण्यासाठी मी आज मुख्यमंत्र्यांना भेटलो.

  • Share this:

मुंबई, 25 जुलै :  मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. मराठा आंदोलन प्रकरण चिघळू नये म्हणून त्वरीत निर्णय घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याचं राणे म्हणाले. तसंच दोन तीन दिवसात प्रकरणावर पडदा पडून परिस्थिती निवळेल अशी शक्यता देखील नारायण राणेंनी वर्तवलीय. दरम्यान, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आणि मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल यांनी देखील मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेऊन मराठा आंदोलनासंदर्भात चर्चा केली.

'त्या' पोलिसाच्या पाठीवर बुटाचा ठसा कुणाचा ?, हे आहे सत्य

आरक्षणवरून मराठा समाजाचा उद्रेक झालाय. आंदोलन चिघळू नये म्हणून हस्तक्षेप करण्यासाठी मी आज मुख्यमंत्र्यांना भेटलो. यात हस्तक्षेप केला जावा, सरकारने विचार करावा आणि त्वरित निर्णय घ्यावा अशी त्यांना विनंती केली असं नारायण राणे म्हणाले. दोन ते तीन दिवसात हालचाली होतील आणि यावर पडदा पडेल. पत्रकारांनी काही असे शब्द वापरू नका की आंदोलन चिघळेल असंही राणे म्हणाले. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर गेले होते.

काकासाहेबाने ज्या पुलावरुन उडी घेतली, त्याबद्दल संभाजी ब्रिगेडने घेतला 'हा' निर्णय

मात्र, मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर नारायण राणे यांनी बोलण्यास नकार दिला. मराठा समाजाला अरक्षणापासून फार काळ दूर ठेवता येणार नाही. आरक्षण लवकरात लवकर कस देता येईल याचा विचार करावा. आंदोलकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावा  आणि आपल्याला न्याय मिळवून घ्यावा. कोण चूक कोण बरोबर हे सांगण्याची वेळ नाही. मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या करू नका असं आवाहनही राणेंनी केलं. कोर्टात प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे त्यात काय बदल करता येईल त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोललो  असंही राणे म्हणाले.

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढाच!, शिवसेना आमदाराचा राजीनामा

विशेष म्हणजे, आघाडी सरकराच्या काळात मराठा आरक्षणासाठी नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असा अहवाल राणे समितीनं दिला होता.

First published: July 25, 2018, 11:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading