मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

2 वर्ष काय टाळ कुटत होते का? पंकजांचा धनंजय मुंडेंना थेट सवाल

2 वर्ष काय टाळ कुटत होते का? पंकजांचा धनंजय मुंडेंना थेट सवाल

'धनंजय मुंडे यांचे ओबीसी आरक्षणावर कोणातीच प्रतिक्रिया नाही, मग कोणत्या तोंडाने लोकासमोर येतात'

'धनंजय मुंडे यांचे ओबीसी आरक्षणावर कोणातीच प्रतिक्रिया नाही, मग कोणत्या तोंडाने लोकासमोर येतात'

'धनंजय मुंडे यांचे ओबीसी आरक्षणावर कोणातीच प्रतिक्रिया नाही, मग कोणत्या तोंडाने लोकासमोर येतात'

  • Published by:  sachin Salve

बीड, 19 डिसेंबर : नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने बीडमध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे (pankaja munde)  आणि राष्ट्रवादीचे नेते धंनजय मुंडे (dhanjay munde) यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. तुम्ही 32 व्या नंबरचे मंत्री आहात मग  2 वर्ष काय टाळ कुटत होते का? असा जळजळीत सवाल पंकजांनी थेट धनंजय मुंडेंना विचारला आहे.

बीड (beed) जिल्ह्यातील वडवणी इथं नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकार आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

निवडणुकीच्या प्रचारसभेत 100 कोटींची घोषणा केली. पाच नगरपंचायतला 500 कोटी आणणार, असं विधान धनंजय मुंडे यांनी पाटोदा येथील जाहीर सभेत केलं होतं. या विधानाचा समाचार घेत पंकजा मुंडे म्हणाल्या की, 'सगळं माझ्याच्या गळ्यात आलं पाहिजे हे आमदार आणि पालकमंत्री यांचं सुरू आहे. याला जेलमध्ये घालू त्याला जेल मध्ये घालू सगळ्यांना जेलमध्ये घालणारा पालकमंत्री पाहिजे का? कुणाचं घर बरबाद करायचं असं राजकारण मुंडे साहेबानी शिकवलं नाही'

अरारारा खतरनाक! पठ्ठ्याने कमालच केली; Driving Video पाहून भलेभले पडले गार

तसंच, 'धनंजय मुंडे यांचे ओबीसी आरक्षणावर कोणातीच प्रतिक्रिया नाही, मग कोणत्या तोंडाने लोकासमोर येतात. आरक्षण द्या नाहीतर नका देऊ, पण आमची दुकानं चालली पाहिजे असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना वाटतं आहे' अशी टीकाही पंकजांनी केली.

पुढील आठवड्यात बाजाराची दिशा कशी असेल? 'हे' घटक ठरतील महत्वपूर्ण

या सरकारचं भविष्य फार चांगलं नाही, यांचा कबाडा होणार आहे. राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे.  महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही, तर याचे कबाड निघणार आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

First published: