मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिवसैनिकावर हल्ला करणारा भाजपचाच कार्यकर्ता, नितेश राणे जामीन प्रकरणी कोर्टात काय घडलं?

शिवसैनिकावर हल्ला करणारा भाजपचाच कार्यकर्ता, नितेश राणे जामीन प्रकरणी कोर्टात काय घडलं?

'फडणवीस आमचे नेते आहेत त्यांच्या बाबतीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे वागत असतील तर राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात कसे फिरता कसे ते आम्ही बघतो'

'फडणवीस आमचे नेते आहेत त्यांच्या बाबतीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे वागत असतील तर राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात कसे फिरता कसे ते आम्ही बघतो'

या हल्ल्यात आमदार नितेश राणे यांचा सहभाग स्पष्ट असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कणकवली, 28 डिसेंबर : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या (Sindhudurg District Cooperative Bank Election) रणधुमाळीत शिवसैनिक संतोष परब (Shivsainik Santosh Parab) यांच्यावर हल्ला प्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालयात भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. या प्रकरणी उद्या निकाल येणार आहे. पण, ज्या सचिन सातपुते नावाच्या व्यक्तीने हल्ला केला तो भाजपाचा कार्यकर्ता असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत (Shiv Sena candidate Satish Sawant) यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब (Shivsainik Santosh Parab) यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. शिवसैनिक संतोष परब हल्ल्या प्रकरणी कणकवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी आमदार नितेश राणे यांनी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. आज जिल्हा सत्र न्यायालयात या अर्जावर सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आणि भूषण साळवी यांनी बाजू मांडली. तर नितेश राणे यांच्याबाजूने ऍड संग्राम देसाई यांनी युक्तीवाद केला.

'कणकवली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात आमदार नितेश राणे यांचा सहभाग स्पष्ट असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर स्वाभिमानी संघटनेचा सदस्य सचिन सातपुते याने नितेश यांच्या आदेशावरुन संतोष परब याच्यांवर प्राणघातक हल्ला केला. सचिन सातपुते हा  आधी स्वाभिमानी संघटनेत होता, नंतर आता तो भाजपमध्ये आहे, असा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे.

तसंच, 'ती अनोळखी माणसे होती तर त्यांनी संतोष परब यांच्या गाडीला का धडक दिली. ते धडक देऊन थांबले नाही तर त्यांनी येऊन त्यांच्या छातीवर चाकूने वार केले. हे मेडिकल रिपोर्ट मध्ये देखील सिद्ध झाल आहे. संतोष परब यांना ज्या इनोव्हा कारने धडक दिली. त्यातील दोन जणांनी माझ्या समोर नितेश राणे आणि गोट्या सावंत यांना कळवायला पाहीजे असं बोलले आहे.

(वयाच्या 39 व्या वर्षीही Anderson चा फिटनेस वाखाणण्याजोगा! 'हे' आहे कारण)

पोलिसांनी ४ आरोप पकडले. त्यांच्याकडे शस्त्र देखील मिळाले त्याचा सहभाग देखील दिसून आला यामध्ये पोलिसांनी काय चुकीचा तपास केला ? पोलीस आरोपींना २४ तास कस्टडीत ठेवत होते. त्यावर त्याच समाधान होत नव्हतं म्हणून ते पोलीस कस्टडी घेत होते.  जर ४ जणांना अटक केली त्यांना सहकार्य केलं जात नव्हतं पोलिसांकडून तर त्यासंदर्भात का आवाज उठवला नाही. आता का बोलत आहात? असा सवालही सरकारी वकिलांनी उपस्थितीत केला.

आपल्या मागे प्रभावी माणसे आहेत म्हणून आरोपींनी गोट्या सावंत आणि नितेश राणे यांची नाव घेतली. कारण त्यांना माहीत होत की या दोन नावाची दहशत आहे, असंही सरकारी वकील म्हणाले.

(Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात आज वाढ, नवे दर चेक करा)

तर नितेश राणे यांच्या वतीने संग्राम देसाई यांनी युक्तीवाद करत सरकारी वकिलांचा आरोप फेटाळून लावले.

जर नितेश राणे यांना पोलिसांनी दोन समन्स बजावले व चौकशीला हजर असताना देखील त्यावेळी मोबाईल तपासणीची मागणी का केली नाही? तसंच पोलिसांनी या तपासात कमालीची गुप्तता बाळगली असताना एकाही आरोपीचे नाव जाहीर नसताना खासदार विनायक राऊत पत्रकार परिषद घेऊन फक्त नितेश राणे यांचेच नाव का घेतात. यावरून पोलीस दबावाखाली काम करत असून या तापसाबाबत संशय व्यक्त केला जातो असा युक्तिवाद नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी केला.

नितेश राणे यांचे वकिल संग्राम देसाई यांच्या युक्तिवादातील काही महत्त्वपूर्ण मुद्दे

१. नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा या प्रकरणात कोणताही संबंध येत नाही. हा बनाव करण्यात आला आहे. जिल्हा बँक निवडणूक संदर्भात जाणीवपूर्वक नितेश राणे यांच नाव गोवण्यात आलेल आहे.

२. आमदार नितेश राणे दोन वेळ पोलीस चौकशीसाठी पोलिस स्थानकात हजर होतें मात्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात जात असताना जो आवाज काढला त्याचा राग ठेऊन त्याला नितेश राणे यांना अटक करावी यासाठी पोलिसांवर दबाव वाढला.

३. संतोष परब आणि नितेश राणे यांचा पूर्ववैमन्यस्य कोणतही नव्हतं.

४. फिर्याद देण्यापूर्वी मीडियासमेर सतीश सावंत यांनी नितेश राणे यांचा हात आहे असं सांगितलं.

या जामीन अर्जावर जवळपास दोन तास युक्तीवाद सुरू होता. दोन्ही वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी उद्या बुधवारी दुपारी २.४५ च्या नंतर होणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळणार की अटक होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निकालामुळे कणकवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

First published:
top videos