धनंजय मुंडे प्रकरण : विवाहबाह्य संबंधांच्या कबुलीमुळे अडचणी वाढणार? कायदा काय सांगतो?

धनंजय मुंडे प्रकरण : विवाहबाह्य संबंधांच्या कबुलीमुळे अडचणी वाढणार? कायदा काय सांगतो?

लोकप्रतिनिधीच्या विवाहबाह्य संबंधांबाबत कायदा काय सांगतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. यात निवडणूक आयोगाची भूमिकाही कळून घेतली पाहिजे.

  • Share this:

मुंबई, 13 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (NCP leader Dhananjay Munde) यांच्यावर नुकतेच एका महिलेनं बलात्काराचे आरोप केले. यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. आता विरोधी पक्षही या संधीचा फायदा घेण्यासाठी सरसावला असून भाजपनं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र याबाबत कायदा (law) काय सांगतो ते जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे.

धनंजय मुंडे यांचं जे प्रतिज्ञापत्र इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या (Election commission of India) वेबसाइटवर दिसतं, त्यात त्यांनी केवळ पत्नी आणि तीन मुलींचा उल्लेख केला आहे. विवाहबाह्य संबंधातील (extramarital affair) मुलांबाबत यात माहिती दिसून येत नाही.

निवडणुकीसाठी (election) उमेदवार निवडणूक आयोगाकडे आपापली वैयक्तिक माहिती, मालमत्ता, व्यवसाय अशी सर्व माहिती प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून देत असतो. यात दिलेली माहिती खरी असल्याचंही उमेदवार लिहून देतो. शिवाय आपण कोणतीही बाब लपवत नसल्याचंही त्याला सांगावं लागतं. पण याचा भंग होत असल्याचं आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द होऊ शकते. उमेदवार आमदार, खासदार असल्यास ही सर्व पदं रद्द होऊ शकतात.

विविध तज्ज्ञांमध्ये याबाबत मतमतांतरं आहेत.  बीबीसी मराठीने दिलेल्या वृत्तात काही तज्ज्ञ म्हणतात, की विवाहबाह्य संबंध असले तर त्याची माहिती निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात देण्याची गरज नसते. त्यापासून त्यांना अपत्य असले तरी आणि त्यांनी अपत्यांना आपले नाव दिले असले तरी नियमानुसार प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख नसल्यास कारवाई होऊ शकत नाही.

आपल्यावरच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देताना धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे, की आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीशी आपले परस्पर सहमतीनं संबंध होते. या संबंधांतून दोन मुलंही झाली असून त्यांच्याही सांभाळ मी करतो आहे. सदर दोन्ही मुलांना मी माझं नावसुद्धा दिलं आहे.सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यानं तिच्या पालनपोषणाची सर्वतोपरी जबाबदारी मी स्वीकारली आहे.

महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमा खापरे यांनी याबाबत भूमिका मांडताना म्हटलं, की हिंदू धर्मात दोन पत्नी असणं अमान्य आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू.

Published by: News18 Desk
First published: January 13, 2021, 6:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading