Home /News /maharashtra /

मुंबईत पूर्ण क्षमतेनं लोकल सुरू होणार पण.., रेल्वेनं दिलं राज्य सरकारच्या पत्राला उत्तर

मुंबईत पूर्ण क्षमतेनं लोकल सुरू होणार पण.., रेल्वेनं दिलं राज्य सरकारच्या पत्राला उत्तर

राज्य सरकारनं तांत्रिक उपायांसह या मुद्द्यावर पुढे यावं. त्यांना सर्व माहिती आणि आकडेवारी पुरवण्यास आम्ही तयार

मुंबई, 29 ऑक्टोबर: महिला आणि वकीलांना लोकल प्रवासाची मुभा दिल्यानंतर आता सर्वसामान्य प्रवाशांनाही रेल्वे प्रवासाची (Mumbai Local) मुभा मिळावी, अशी विनंती राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनाकडे केली होती. आता पश्चिम रेल्वे प्रशासनानं राज्य सरकारच्या पत्राला उत्तर दिलं आहे. आपली पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेनं लोकल सुरू करण्याची रेल्वेची तयारी असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण, त्याचबरोबर काही प्रश्न देखील रेल्वे प्रशासनानं उपस्थित केले आहेत. हेही वाचा...मोठी बातमी! दिवाळी सणातील ST ची हंगामी तिकीट दरवाढ रद्द, सर्वसामान्यांना दिलासा प्रत्येक तासाला महिलांसाठी स्पेशल ट्रेन सुरू करणं अशक्य आहे. महिलांसाठी स्पेशल ट्रेन सुरू करणं म्हणजे गरजेपेक्षा जास्त उपलब्धता करून देणं असेल, असं म्हटलं आहे. पूर्वी महिलांसाठी दिवसभरात 10 स्पेशल लोकल ट्रेन धावत होत्या. सध्या 6 ट्रेन धावत आहेत. कोविड-19 पूर्वी दररोज 1367 लोकलच्या फेऱ्या व्हायच्या. त्यातून सुमारे 35 लाख प्रवाशांची ये-जा करत होते. परंतु, आता कोरोनाच्या संकटात पूर्ण क्षमतेनं लोकल चालवल्यास गर्दीचं नियोजन कसं करणार? क्यूआर कोड, टीसी स्टाफ अपुरा पडेल? कोबीड काळात पूर्ण क्षमतेने चालवल्या तरी नऊ लाख सहा हजार प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. महिलांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकंल चालवल्या तर त्यात पुरुष प्रवासी पण शिरतील त्यांच्यावर नियंत्रण कसे ठेवणार? या शिवाय एकदा सुविधा सुरु केली तर तिला माघारी घेणे म्हणजे मोठ्या टीकेला सामोरं जावं लागेल, असंही रेल्वे प्रशासनानं म्हणलं आहे. राज्य सरकारनं तांत्रिक उपायांसह या मुद्द्यावर पुढे यावं. त्यांना सर्व माहिती आणि आकडेवारी पुरवण्यास आम्ही तयार असल्याचं पश्चिम रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. काय आहे राज्य सरकारची मागणी... पहाटे पहिल्या लोकल पासून सकाळी 7.30 पर्यंत सर्वांना लोकल प्रवास करण्यासंदर्भात राज्य सरकारतर्फे विनंती करण्यात आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 4.30 पर्यंत या वेळेतही सर्वांना प्रवास मुभा द्यावी, ही मागणी राज्य सरकारची रेल्वे प्रशासनास केली आहे. मुंबईत प्रवाशांचे हाल होत असल्याने राज्य सरकारने ही विनंती केली आहे. सर्वसामान्य व्यक्तीस सकाळी 11 ते दुपारी 4:30 पर्यंत आणि रात्री 8 ते रात्री शेवटच्या लोकलपर्यंत पास किंवा तिकिटावर प्रवास करता येणार आहे. लेडीज स्पेशल ट्रेन दर तासाला एक असेल. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लोकल गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. 7 महिन्यानंतर अखेर आता लोकल महिला, वकील आणि सुरक्षा रक्षक तसेच कामगारांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. अशातच आता लवकरच सर्व प्रवाशांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत ठाकरे सरकारने दिले आहेत. मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका प्रवाशाच्या प्रश्वाला ट्विटरवर उत्तर देत लवकरच लोकल सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ असे संकेत दिले होते. हेही वाचा...दिवाळीची खरेदी करताना आपण फसवले जाणार नाही यासाठी 'या' चुका टाळा लोकल बंद असल्यामुळे कामासाठी मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांना बस किंवा रस्ते मार्गानं जावे लागते. परिणामी ट्रॅफिकमध्ये त्यांचा अर्धा वेळ जातो, यामुळे एका संतप्त प्रवाशानं ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्रात या प्रवाशानं महिलांना लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली तशी सर्वसामान्यांना आणि व्यावसायिक, कर्मचारी यांना का नाही? दिवाळी सणात प्रवास नाकारणं खूप मोठा अन्याय आहे, असे ट्वीट केले होते.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Maharashtra, Mumbai, Mumbai local

पुढील बातम्या