आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून युवा सैनिकांचं फडणवीसांच्या कुलदैवताला साकडं

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून युवा सैनिकांचं फडणवीसांच्या कुलदैवताला साकडं

आता फडणवीसांच्याच कुलदैवताला आदित्य हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साकडं घालण्याच्या युवा सैनिकांच्या कृतीची सर्वत्र चर्चा होतेय.

  • Share this:

विरेंद्र उत्पात, पंढरपूर 4 नोव्हेंबर : राज्यात सत्तास्थापनेसाठी  रस्सीखेच चाललीय. दावे प्रतिदावे केले जात आहेत. मुख्यंत्रिपद मिळवायचंच यासाठी शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केलीय. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी युवा सैनिकांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुलदैवतालाच साकडं घातलंय. माळशिरस तालुक्यातील युवासेनेचे गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली संगम ते निरानरसिंगपूर अशी पायी दिंडी काढण्यात आली. निरानरसिंगपूरमधला लक्ष्मी-नृसिंह हे देवेंद्र फडणवीसांचं कुलदैवत आहे. युवा सैनिकांनी लक्ष्मी-नृसिंह मंदिरात जावून पूजा केली आणि आदित्य ठाकरे मुख्यंत्री व्हावेत म्हणून देवाला साकडं घातलं. आदित्य यांनी वरळीतून विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. ठाकरे घराण्यातून निवडणूक लढविणारे आदित्य हे पहिलेच सदस्य आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून शिवसेने आदित्य यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं होतं.आदित्य यांनी जनआशीर्वाद यात्रा काढून महाराष्ट्राचा दौराही केला होता. आता फडणवीसांच्याच कुलदैवताला आदित्य हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साकडं घालणं या युवा सैनिकांच्या कृतीची सर्वत्र चर्चा होतेय. इकडे महाराष्ट्रात आणि राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आलाय.

मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस शिवसेनेला नकोत का? काय म्हणाले संजय राऊत

दिल्लीत काय झालंय?

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीवर प्रामुख्याने चर्चा झाली. सत्तास्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेचं बिनसल्याने गेल्या 11 दिवसांपासून सत्ता स्थापन होऊ शकली नाही. त्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय. सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी ही भेट झाली.

भाजप आणि शिवसेनेचं फाटलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देऊ शकते अशीही चर्चा आहे. उघडपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनाला पाठिंबा देण्याची शक्यता फेटाळून लावलीय. मात्र राजकारणात सर्व शक्यतांचा विचार केला जात असल्याने गरज पडली तर भाजपला एकटं पाडण्यासाठी राज्यात नवी समिकरणं तयार होऊ शकतात. या सर्व पार्श्वभूमीवर पवार आणि सोनिया गांधी यांची भेट महत्त्वाची मानली जातेय.

गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रातले काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांना राज्यातल्या स्थितीची माहिती दिली होती. सोनियांशी भेट झाल्यानंतर पवार यांनी पत्रकारांना माहिती दिली. या भेटीच्या वेळी अजित पवार आणि प्रफुल पटेलही उपस्थित होते.

मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस शिवसेनेला नकोत का? काय म्हणाले संजय राऊत

पवार म्हणाले, मी सोनियांना महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीची माहिती दिली. राज्यात सध्या अस्थिरता आहे. त्या पार्श्वभूमीवर  आम्ही सगळी चर्चा केली. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला किंवा आम्ही त्यांना कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही. राज्यात भाजपच्या विरोधी वातावरण आहे. शिवसेनेने 170 चा नंबर कुठून आणला ते माहित नाही. आमच्याकडे सत्ता बनविण्यासाठी संख्याबळ नाही. संजय राऊत आमच्याकडे 170चं सख्याबळ असल्याचं सांगत आहेत त्यावर बोलताना पवार म्हणाले त्यांच्याबरोबर बरोबर भाजपचा मोठा गट असावा. मुंबईत मंगळवारी पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करणार असून त्यानंतर पुन्हा सोनियांशी भेटणार असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं. पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नव्या राजकीय चर्चेला सुरुवात होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 09:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading