दादा यांना आवरा...अजित पवारांच्या काटोवाडीतही युवकांचा पोलिसांवर हल्ला

दादा यांना आवरा...अजित पवारांच्या काटोवाडीतही युवकांचा पोलिसांवर हल्ला

क्रिकेट खेळणाऱ्या एका युवकाने या पोलीस कर्मचाऱ्याला स्टंपने मारहाण केली. तर जमावातील एकाने दगड मारला.

  • Share this:

बारामती 27 मार्च : बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे आज सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान शाळेच्या मैदानावर 40 ते 45 जणांचा एक गट क्रिकेट खेळत होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस शशिकांत कवितके यांनी त्याठिकाणी जाऊन आपण जमाव करू नका. घरातच जाऊन बसा. क्रिकेट खेळू नका असे सांगत असतानाच, क्रिकेट खेळणाऱ्या एका युवकाने या पोलीस कर्मचाऱ्याला स्टंपने  मारहाण केली. तर जमावातील एकाने दगड मारला यामध्ये बारामती ग्रामीण चे पोलीस कर्मचारी शशिकांत कवितके हे जखमी झाले असून त्यांच्यावर बारामती शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन केलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये, त्यांनी घरातच थांबावे, असं राज्य सरकारने आवाहन केले आहे. तरी देखील बारामती शहरात क्वारंटाईन केलेले नागरिक रस्त्यावर फिरत असल्याचे समोर आलं आहे. त्यात जोशी समाजातील काही नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांना हटकलं असता त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. जमावाने केलेल्या दगडफेकीत 2 पोलिस अधिकारी, महिला पोलिस अधिकाऱ्यांसह 5 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

हेही वाचा...संचारबंदीमुळे वेळेत गावी पोचला नाही मुलगा, उपचाराअभावी विझली वडिलांची प्राणज्योत

या घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलिस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी जोशी समाजाच्या 15 जणांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेली माहिती अशी की, जळोची परिसरात जोशी समाजातील काही जणांना क्वारंनटाईन करण्यात आलं आहे. आरोग्य विभागाने त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला आहे. असं असताना या समाजातील काही युवक या परिसरात फिरत होते. याला येथील गावकऱ्यांनी अटकाव केला. काही गावकऱ्यांना क्वारंटाईन केलेल्या नागरिकांनी मारहाण केली.

हेही वाचाअरे देवा...नवी मुंबईत दीड वर्षाच्या बाळाला कोरोना, एकाच घरातला चौथा रुग्ण

त्यानंतर बारामती शहर पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिस जमावाला पांगवण्यासाठी गेले असता जोशी समाजाच्या महिला व नागरिकांनी पोलिसांवर आणि स्थानिकांवर दगडफेक केली. यात बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, एपीआय, एक महिला अधिकारा, 2 महिला पोलिस कर्मचारी व तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

First published: March 27, 2020, 8:11 PM IST

ताज्या बातम्या