गर्दुल्या तरुणाने काढली छेड, महिला पोलिसांनी 'फिल्मी स्टाईल' पाठलाग करून दिला चोप

गर्दुल्या तरुणाने काढली छेड, महिला पोलिसांनी 'फिल्मी स्टाईल' पाठलाग करून दिला चोप

महिला पोलीस कॉन्स्टेबलनी हा सर्व प्रकार पाहून तात्काळ पाठलाग करत बाळू सदामते या टवाळखोर गर्दुल्याला पकडून चांगला चोप दिला.

  • Share this:

अनिस शेख, देहू 3 सप्टेंबर : देहूरोड रेल्वे रेल्वे स्थानकावरून कॉलेजला जाणार्‍या महाविद्यालयीन तरुणींची छेड काढणाऱ्या गर्दुल्याला देहूरोड महिला पोलिसांनी पाठलाग करून अचक केली. या महिला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने त्याला पाठलाग करत पकडले आणि चांगलाच चोप दिला.  ही घटना देहूरोड बाजारपेठेत घडली. रेल्वे स्थानक परिसरात महिला तसेच मुलींची छेडछाड रोखण्यासाठी जीआरपी पथक तसेच रेल्वे पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत मात्र रेल्वे पोलिसांकडून अशा विकृतांवर कुठलीच कारवाई होत नसल्याने  महिला तसेच मुलींच्या छेडछाडीच्या घटनेत वाढ झाली आहे.

बाळू सदामते या गर्दुल्याने ४ महाविद्यालयीन तरुणीची छेड काढत अश्लील भाषेत त्यांना शिवीगाळ केली. गर्दुल्यापासून जीव वाचवत बाजारपेठेत महाविद्यालय मुली पळू लागल्या होत्या. त्यावेळी बाजारपेठेत गस्त घालणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबल श्रद्धा वाघमारे आणि आरती कदम यांनी हा सर्व प्रकार पाहून तात्काळ पाठलाग करत बाळू सदामते या टवाळखोर गर्दुल्याला पकडून चांगला चोप दिला. वेळीच पोलिसांची मदत मिळाल्याने तरुणींनी ही सुटकेचा नि:श्वास सोडला.

शिवसेना-भाजपवर पलटवार करण्यासाठी आघाडीची बैठक, रणनीती आखणार

देहूरोड रेल्वे स्थानक परिसरात याआधीही टवाळखोरां कडून कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याची छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. रेल्वे स्थानक तसेच बाजारपेठ परिसरात टवाळखोर, तसेच गर्दुल्यांवर  कारवाईची मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे

आता CCTV आणि ड्रोन कॅमेरा ठेवणार चोरांवर

Loading...

वाढती लोकसंख्या आणि चोरीचं प्रमाण पाहाता आता पोलिसांनीही हायटेक गोष्टींचा वापर करायला सुरूवात केलीय. गर्दीची ठिकाणं आणि उत्सवांचा मोसम लक्षात घेता अत्याधुनिक मोबाईल व्हॅन आता चोरांवर करडी नजर ठेवणार आहे. मोबाईल सीसीटीव्ही कॅमेरा व्हॅन हा मराठवाड्यातील पहीला प्रयोग बीड मध्ये राबवला जातोय. या व्हॅनच्या माध्यमातून डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी  महत्वाची भूमिका बजावली जाणार आहे. गणपती उत्सव, मोहरम आणि निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर  बीड मधील पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त आणि नवीन तंत्रज्ञनाचा वापर केला जात आहे.

आशिष शेलारांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला राज ठाकरेंची भेट, चर्चेला उधाण

या व्हॅनमध्ये ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात 1353 परवानगी धारक गणेश मंडळाना प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी दत्तक देण्यात आलाय. तसेच बंदोबस्तासाठी 27 वरिष्ठ पोलीस निरिक्षक, 84 स.पोलीस निरिक्षक, 1200 कर्मचारी, 1100 होमगार्ड एसआरपीएफ कंपनी, असा तगडा बंदोबस्त असणारं आहे. तसेच समाजिक विधायक उपक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळांना गणराय अवार्ड देण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 05:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...