PUBG Game मुळे तरुण अत्यवस्थ... मानसिक संतुलनही बिघडले

PUBG Game मुळे तरुण अत्यवस्थ... मानसिक संतुलनही बिघडले

मोबाइलवर सातत्याने पबजी गेम (PUBG) खेळल्यामुळे तरुण अत्यवस्थ आहे. त्याचे मानसिक संतुलनही बिघडले आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर,(प्रतिनिधी)

कोल्हापूर, 15 सप्टेंबर: मोबाइलवर सातत्याने पबजी गेम (PUBG) खेळल्यामुळे तरुण अत्यवस्थ आहे. त्याचे मानसिक संतुलनही बिघडले आहे. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये तरुणाली शनिवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले. या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इंद्रजित कोळी (वय-20, रा. पोर्ले, ता.पन्हाळा) असे या तरुणाचे नाव आहे. इंद्रजित हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. तो मोबाइलवर सातत्याने पबजी गेम खेळत होता. गेल्या काही दिवसांपासून तो कोणाशी जास्त बोलत नव्हता. शनिवारी (14 सप्टेंबर) इंद्रजित अचानक आरडाओरडा करू लागला. आई-वडिलांनी त्याला सीपीआरमध्ये उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी त्याच्याकडून मोबाइल काढून घेतला असता त्याने त्यांच्याशी वाद घातला. नंतर तो काही तासांतच घरी निघून गेला. इंद्रजितचे आई-वडील शेतकरी असून त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे.

मोबाइल गेमचा अतिरेक झाल्याने इंद्रजितवर ही परिस्थिती ओढवली असल्याचे डॉ. विजय बारणे यांनी सांगितले आहे. इंद्रजितवर योग्य वेळेत उपचार होणे गरजेचे असल्याचेही डॉ. बारणे यांनी म्हटले आहे.

VIDEO: इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी? यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2019 09:49 AM IST

ताज्या बातम्या