धुणे धुण्यासाठी आलेल्या महिलेच्या अंगावर पडली विद्युत वाहिनी, जागीच सोडला प्राण

धुणे धुण्यासाठी आलेल्या महिलेच्या अंगावर पडली विद्युत वाहिनी, जागीच सोडला प्राण

कर्जत तालुक्यातील उंबराचे लवण या ठिकाणी उच्च दाबाची विद्युत वाहिनी अंगावर पडून महिलेचा जागेवरच मृत्यू झाला

  • Share this:

साहेबराव कोकणे,(प्रतिनिधी)

अहमदनगर,13 डिसेंबर: कर्जत तालुक्यातील उंबराचे लवण या ठिकाणी उच्च दाबाची विद्युत वाहिनी अंगावर पडून महिलेचा जागेवरच मृत्यू झाला आहे. सुरेखा अनिल ननवरे असे महिलेचे नाव असून त्या धुणे धूत असताना त्यांच्या अंगावर विद्युत वाहिनी तुटून पडली. शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेली माहिती अशी की, वीज वितरण अधिकारी कुलकर्णी घटनास्थळी पोहोचले. सुरेखा ननवरे त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. त्या मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह होत्या. त्या कुटुंबातील कर्त्या व्यक्ती होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे.

येथील विद्युत वाहिनी अनेक वर्षांपासून जीर्ण झाल्या आहेत. दुरुस्ती करण्यासंदर्भात वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. मात्र, वीज वितरण कंपनीने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे सुरेखा ननवरे त्याचा नाहक बळी गेला आहे.

संगमनेरमध्ये कापसाचा टेम्पो ओढ्यात कोसळला, 3 तरुणांचा जागीच मृत्यू

कापसाचा टेम्पो ओढ्यात कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वीजवळील हंगेवाडी-ओझर रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्यामध्ये मालवाहू कापसाचा टेम्पो पलटी झाला. यामध्ये असलेल्या 3 मजूरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडकीस आहे. पोलीस सध्या अपघाताची तपासणी करत आहेत.

या अपघातात परवेज शेख, जुनेद शेख, फरहान शेख या तिंघाचा टेम्पोखाली दबुन मृत्यू झाला. नाशिकमध्ये असलेल्या एका व्यापाऱ्याचा कापूस भरण्यासाठी जामनेर येथून टेम्पो (क्र. एमएच 18 एम 8619) चा चालक वसीम नजीर शेख हा आश्वी परिसरातील हंगेवाडी या ठिकाणी आला होता. कापूस भरून पुन्हा हा टेम्पो हंगेवाडी-ओझर मार्गे बाभळेश्वर फाट्याकडे जात होता. अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्यानो त्याच दरम्यान टेम्पो थेट ओढ्यामध्ये पलटी झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी ओढ्यामध्ये पाणीही होते. त्यामुळे टेम्पोखाली परवेज शेख, जुनेद शेख, शेख फरहान हे तिघेजण दबल्याने तिघाही मजुरांचा जागीच मृत्यू झाला. घटेनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाती टेम्पो ओढ्यातून बाजूला करत तिघांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. शवविच्छेदनासाठी हे मृतदेह पाठवण्यात आले असून याची माहिती मृतांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे.

महामार्गावर वारंवार वाहनांचे अपघात होत असतात. मंगळवारी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या कारची पूढे जाणार्‍या ट्रकला मागून जोरदार धडक बसल्याने अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली. या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले.

पहाटे तीन वाजताच्या सुमारास ओझर गावाजवळ हा अपघात झाला. महेश कदम अशी मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे तर संतोष भोसले आणि प्रवीण कोकाटे अपघातामध्ये गंभीर जखमी झाले. अपघात घडताच स्थानिकांकडून तात्काळ जखमींना नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.

Published by: Sandip Parolekar
First published: December 13, 2019, 1:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading