नवऱ्याचे अश्लिल VIDEO पाहिल्याचा राग, त्याने बायकोलाच पेट्रोल टाकून जाळलं

बायकोने आपला मोबाईल घेऊन सगळे 'प्रताप' पाहिल्याचा राग त्याला आला. त्यातून त्या दोघांचे भांडणही झाले. याच रागतून त्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं.

बायकोने आपला मोबाईल घेऊन सगळे 'प्रताप' पाहिल्याचा राग त्याला आला. त्यातून त्या दोघांचे भांडणही झाले. याच रागतून त्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं.

  • Share this:
अहमदनगर 13 फेब्रुवारी : हिंगणघाटमधल्या जळीत प्रकरणाचे पडसाद अजुनही राज्यात उमटत आहेत. त्यावर राज्यभर संताप व्यक्त होत असतानाच अहमदनगर जिल्ह्यात अशीच एक संतापजनक घटना घडल्याचं उघड झालंय. पतीच्या अनैतिक संबंधांचे फोटो आणि व्हिडीओ पत्नीने त्याच्याच मोबाईलमध्ये बघितले होते. त्याचा राग नवऱ्याला आला आणि त्याने बायकोला पेटवून दिले. यात ती मोठ्या प्रमाणावर भाजली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. नेवासे तालुक्‍यातील मोरेचिंचोरा येथील ही धक्कादायक घटना आहे. शंकर दुर्गे असं आरोपीचं पतीच नाव आहे. शंकरचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध होते. त्याने त्याचे व्हिडीओ बनवले होते आणि फोटोही काढले होते. हे सर्व त्याने त्याच्या मोबाईलमध्येच ठेवलं होतं. एक दिवस शंकरच्या बायकोने त्याच्या मोबाईलमध्ये हे त्याचे सगळे प्रताप बघितले. त्याचा जाब त्याने नवऱ्याला विचारला. मला गोळ्या घालून मारून टाका, हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूनंतर आरोपीची प्रतिक्रिया आपलं बिंग फुटल्याचं शंकरला लक्षात आलं. बायकोने आपला मोबाईल घेऊन सगळे 'प्रताप' पाहिल्याचा राग त्याला आला. त्यातून त्या दोघांचे भांडणही झाले. याच रागतून त्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. त्यात ती मोठ्या प्रमाणावर भाजली गेली. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सोनई पोलीस ठाण्यात पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. हेही वाचा... मी पळून गेलो नाही तर..., भक्ताच्या बायकोला घेऊन पळालेल्या महाराजाचा VIDEO VIRAL खेळताना 2 वर्षांचा संस्कार पडला 10 फुट खोल नाल्यात, 12 तासानंतरही शोध सुरूच
First published: