जितेंद्र जाधव, बारामती 10 ऑक्टोंबर : राजीनामा नाट्यानंतर शेती करण्याची इच्छा व्यक्त करणारे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आता निवडणुकीचा जोरदार प्रचारात करताहेत. बारामती या पारंपरिक मतदारसंघातून अजित दादा निवडणूक लढवताहेत. मात्र राज्यातल्य प्रचाराचीही जबाबदारी त्यांच्यावर आसल्याने त्यांना राज्यभर फिरावं लागतंय. त्यामुळे बारामतीतल्या प्रचाराची धुरा पवार कुटुंबीयांनी आपल्या हातात घेतलीय. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ आणि जय हे सगळेच घरोघरी जाऊन प्रचार करताहेत. सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यात प्रचाराला सुरुवात केलीय. यावेळी बारामतीकरांचा चांगला प्रतिसाद असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच राज्यातील युती शासनाने दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नाहीत. तसेच शेतकरी शासनाच्या धोरणामुळे ग्रासलेला आहे. त्यामुळे आघाडीची सत्ता येणार असल्याचं सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री फडणवीस करतात रात्री 12 वाजता फोन, अमित शहांनी सांगितला किस्सा!
तर पार्थ प्रचारामध्ये मावळ या भागात प्रचार करीत असून त्यांचा हात फॅक्चर झाला होता त्यामुळे तो आराम करत होता असंही त्या म्हणाल्या. अजित पवारांच्या विरोधात भाजपने गोपीचंद पडाळकर यांना तिकीट दिलंय. त्या आधी पडाळकर हे वंचितमध्ये होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पडाळकरांवरून वंचितमध्ये वादही निर्माण झाला होता. पडाळकर हे संघाचा माणूस आहेत असा आरोपही झाला होता. अजित पवारांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपने पूर्ण जोर लावला आहे.
राष्ट्रवादीचा यू टर्न
विधानसभा निवडणूक अवघ्या 10 दिवसांवर असताना मात्र उमेदवारीचा घोळ कायम आहे. करमाळ्यात चक्क आपल्याच उमेदवाराला मतदान करू नका, असं पत्रक काढण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढवली आहे. फक्त करमाळ्यातच नाहीतर सांगोल्यातही काहिसा असाच घोळ राष्ट्रवादीने घालून ठेवल्यामुळे तो निस्तारणं कठीण होऊन बसलं आहे.
संजय पाटील घाटणेकर हे करमाळ्यातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत पण अजित पवारांनी मात्र, त्यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना मतदान करण्याचं आवाहन राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना केलं. राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत एक प्रसिद्धी पत्रक काढले आहे. संजय पाटील घाटणेकर यांचा अर्ज काही तांत्रिक अडचणीमुळे अर्ज मागे घेता न आल्यामुळे त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संजयमामा शिंदे यांना मतदान करावं असं आवाहन अजित पवार यांनी पत्रक वाचून केलं आहे. राष्ट्रवादीच्या या यू टर्नमुळे संजय पाटील घाटणेकर मात्र, चांगलेच संतापले आहेत. अजितदादांना आपला हिसका दाखवून देऊ, अशी धमकीच त्यांनी देऊन दिली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा