शिक्षकाची बदली झाल्याने मुलांच्या डोळ्यांना धारा, VIDEO पाहून तुम्हीही हेलावून जाल

शिक्षकाची बदली झाल्याने मुलांच्या डोळ्यांना धारा, VIDEO पाहून तुम्हीही हेलावून जाल

विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं इतकं घनिष्ठ सहसा पाहावयास मिळत नाही पण खैरनार सर याला अपवाद ठरले.

  • Share this:

शिर्डी 14 जानेवारी : कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयातील मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खैरनार यांची विंचूर येथे तातडीने बदली झाल्याने कळताच शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे निरोप देताना मन हेलावले आणि डोळेही पाणावले. लहान मुलांनी तर हंबरडाच फोडला. त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या. सगळी चिमुकली ओक्साबोक्शी रडायला लागली. ह्रदय हेलावणारं अतिशय भावनिक असं हे दृष्य होतं. विद्यार्थी आणि शिक्षक याचं नातं किती अतुट असतं हे दाखविणारी ही घटना होती.

कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या केबीपी प्राथमिक शाळेत 2011 पासून ज्ञानेश्वर खैरनार हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. ते येण्याअगोदर शाळेची अवस्था तेवढी चांगली नव्हती. खैरनार सरांनी कामकाजात आमूलाग्र बदल घडून आणला. शिस्त लावली, शाळेचं रंगरुपच पालटून टाकलं. विद्यार्थ्यांना लळा लावला. विद्यार्थ्यांना चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले त्यांच्या कार्यकाळातच शाळेमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. त्यांच्या या वैशिष्टपूर्ण कामाचा आदर्श परिसरातील मराठी शाळांनी घेतला होता. शालेय कामकाज सुरू असतानाच त्यांना विंचूर येथे बदली झाल्याचे समजले.

राज्यात लवकरच 8 हजार नोकऱ्यांची संधी, पोलिसात मेगा भरतीचे गृहमंत्र्यांकडून संकेत

आपल्या लाडक्या मुख्याध्यापकाला निरोप देताना विद्यार्थी शिक्षक आणि पालक अक्षरशः गहिवरले. मुले-मुली तर अक्षरशः ओक्साबोक्षी रडत होती. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खैरनार यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना दिलेली वागणूक ही इतकी प्रेमळ होती. ग्रामीण भागात शाळांमध्ये मुलं पाठविण्यास फारसे पालक तयार नसतात. मात्र खैरनार सरांनी ही समज खोटी पाडली आणि नवा आदर्श उभा केला.

PM मोदींवरच्या त्या वादग्रस्त पुस्तकावर बंदी आणा, मराठा समाजाची मागणी

परंतु मुख्याध्यापक खैरनार यांच्या कार्यशैलीमुळे शाळेचा पट केवळ टिकलाच नाही. तर त्यामध्ये दरवर्षी वाढ होत राहिली. येथील मुलांशी बोलल्यावर कोणी म्हणणार नाही ही मराठी शाळेची मुलं आहे. एवढं चांगलं शिक्षण, बदल केलेला दर्जेदार गणवेश आणि शैक्षणिक साहित्य लोकसहभागातून उपलब्ध करून दिले.

त्यांच्या कार्यकाळात  लहान मुलांनाही बँकिंग व्यवस्थापन, सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक कार्य याचे आकलन आणि ज्ञान नेहमी देण्यास ते तत्पर राहिले आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं इतकं घनिष्ठ सहसा पाहावयास मिळत नाही पण खैरनार सर याला अपवाद ठरले त्यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा आहे त्याच ठिकाणी सेवा करू द्यावी अशी मागणी आता पालक वर्गाने केली आहे. याबाबत रयत शिक्षण संस्था काय निर्णय घेते याकडे पालकांचं लक्ष लागलंय.

First Published: Jan 14, 2020 02:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading