...जेव्हा भाजपचेच नेते म्हणतात 'कमळा' ऐवजी 'घड्याळा'चं बटन दाबा!

...जेव्हा भाजपचेच नेते म्हणतात 'कमळा' ऐवजी 'घड्याळा'चं बटन दाबा!

'मी अनेक वर्ष राष्ट्रवादीत होते त्यामुळे 'कमळा' ऐवजी 'घडाळ्या'चं म्हणालो. पण लक्षात असू द्या आता घड्याळ नाही तर कमळ हे लक्षात ठेवा.'

  • Share this:

कोल्हापूर 10 ऑक्टोंबर : निवडणुकीच्या प्रचारसभेच बोलणारे कायम जोशात असतात. अतिशय आक्रमपणे बोलून लोकांना आपलं मत पटवून द्यावं या उद्देशाने जोषात आणि आवेशात बोललं जातं. मात्र हा आवेश कधी कधी अंगलटही येतो. त्यामुळे चुका घडतात आणि मग नेत्यांना ती सुधारावी लागते. सोशल मीडियामुळे तर आता काहीच लपून राहात नाही. छोटीशी चूकही लगेच व्हायरल होते. गोकुळगाव शिरगाव इथंही  असंच झालं. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडीक हे बोलताना चुकून 'कमळा' ऐवजी 'घड्याळा'चं बटन दाबा असं म्हणाले आणि सगळ्यांनाच त्यांची चूक लक्षात आली. त्यांनीही क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी चूक सुधारली आणि भाषण पुढे नेलं.

लोकांना मूर्ख बनवू नका, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

धनंजय महाडीक हे अनेक वर्ष राष्ट्रवादीत होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तोच धागा पकडत महाडीक म्हणाले, मी अनेक वर्ष राष्ट्रवादीत होते त्यामुळे 'कमळा' ऐवजी 'घड्याळ' म्हणालो. पण लक्षात असू द्या आता घड्याळ नाही तर कमळ हे लक्षात ठेवा. कमळावरच बटन दाबून भाजपला विजयी करा. अमल महाडीक यांच्या प्रचारासाठीच्या सभेत ते बोलत होते. विरोधक जात, पात, धर्म याचा प्रचारासाठी वापर करत आहेत. अशा कुठल्याही  प्रचाराला बळी पडू नका असं आवाहनही त्यांनी केलं.

मुख्यमंत्र्यांनी नागपूरला बनवलं 'क्राईम सिटी', शरद पवारांचा पलटवार

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अमल महाडीक हे भाजपचे उमेदवार आहेत. अमल महाडीक हे दुसऱ्यांना आपलं नशीब आजमावत असून या मतदारसंघात जोरदार लढत होतेय. महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या 288 जागांसाठी 21 ऑक्टोंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून 24 तारखेला मतमोजणी होणार आहे. प्रचाराचा आता केवळ 9 दिवस राहिले असून सर्वच पक्षांचे बडे नेते मैदानात उतरले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 10:56 PM IST

ताज्या बातम्या